घरक्रीडाटी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! हार्दिक पांड्यानंतर अजून एक ऑलराऊंडर मालिकेबाहेर

टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! हार्दिक पांड्यानंतर अजून एक ऑलराऊंडर मालिकेबाहेर

Subscribe

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने मालिकेतून माघार घेतल्यानंतर आता संघाच्या अजून एका ऑलराऊंडरला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. दीपक हुडा दुखापतीमुळे मालिकेत सहभागी होऊ शकणार नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. परंतु तीन मोठ्या क्रिकेटपटूंना या सामन्याला मुकावं लागणार आहे.

- Advertisement -

बीसीसीआयने हार्दिक पांड्याला विश्रांती दिली आहे. तर मोहम्मद शमी कोरोनाग्रस्त आहे. तर त्यातच नवा धक्का म्हणजे दीपक हुडा दुखापतीमुळे मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वन डे मालिकाही खेळवली जाणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज होणार आहे. हुडा मालिकेत नसल्यामुळे बीसीसीआयने या तिघांच्या जागी उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांचा संघात समावेश केला आहे. तसेच बीसीसीआयने ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

दीपक हुडाच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याला रिहॅबसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे अहवाल द्यावा लागणार आहे. बीसीसीआयने रविवारी एक निवेदन जारी केले होते. दीपक हुडा पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. परंतु आता बीसीसीआयने ट्वीट करून दीपक हुडाला NCAमध्ये रिहॅब करावे लागेल, असे सांगितले आहे.


हेही वाचा : आयसीसी क्रमवारीत कर्णधार हरमनप्रीत कौर टॉप-5


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -