घरदेश-विदेशज्योतिरादित्य सिंधिया घेणार सोनिया गांधी यांची भेट

ज्योतिरादित्य सिंधिया घेणार सोनिया गांधी यांची भेट

Subscribe

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया उद्या, १० सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मध्य प्रदेश राज्यतील राजकीय परिस्थिती तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांना नवीन जबाबदारी देण्याची मागणी राज्यातून सातत्याने होत आहे. लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

आगामी विधानसभा निवडणूक तसेच नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या देशभरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार असून या महत्वपूर्ण बैठकीस सर्व प्रदेशाध्यक्ष, महासचिव तसेच सर्व विधीमंडळाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यात होणाऱ्या निवडणुकांविषयक मंथन होणार आहे. तसेच पक्ष बांधणी बाबत सविस्तर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -