घरट्रेंडिंगआता LPG गॅस कनेक्शन घेणं अधिक सोपं; फक्त 'या' एका कागदपत्राची आवश्यकता

आता LPG गॅस कनेक्शन घेणं अधिक सोपं; फक्त ‘या’ एका कागदपत्राची आवश्यकता

Subscribe

देशभर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गानेमुळे पेट्रोलियम मंत्रालयाने नवीन एलपीजी कनेक्शनचे नियम अधिक सोपे केले आहेत. आता तुम्ही फक्त एक कागदपत्र दाखवून तुमचे गॅस कनेक्शन सहज घेऊ शकता. कोरोनामुळे होणारे नागरिकांचे वाढते स्थलांतर लक्षात घेता मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात एलपीजी गॅस कनेक्शन घेऊ शकता. यासाठी तुम्ही कायमस्वरूपी वास्तव्यास असणाऱ्या पत्त्याचे कागदपत्र असणे बंधनकारक नसेल. तर आता तुम्हाला फक्त एका ओळखपत्राच्या आधारे हे एलपीजी कनेक्शन मिळू शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व तेल कंपन्यांना या संदर्भात सूचना दिल्या असून लवकरच ग्राहकांना त्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात येणार आहेत.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयामुळे आता एलपीजी कनेक्शन घेणे ग्राहकांसाठी अधिक सुलभ होणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने तेल कंपन्यांना सध्या असलेल्या नियमांमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता स्थलांतर करणाऱ्या ग्राहकांना कनेक्शन घेण्यास सुलभ होणार असल्याचे मंत्रालयाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे LPG गॅस कनेक्शन घेता येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने दोन वर्षात १ कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची योजना तयार केली आहे. बुधवारी, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज या कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अशी माहिती दिली की, देशातील अर्थव्यवस्था उदयोन्मुख आहे. जगातील विकसनशील अर्थव्यवस्था, आपली रणनीती यापेक्षा आपली प्राथमिकता भिन्न आहे. भारत आपली अर्थव्यवस्था कार्बन मुक्त ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. कार्बन-मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यात कार्बन उत्सर्जन कमी होते, जेणेकरून पर्यावरण हानी होण्याचे प्रमाण कमी होईल.


Coronavirus : ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांची आज उत्पादकांसह महत्त्वाची बैठक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -