घरदेश-विदेशCoronavirus : ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांची आज उत्पादकांसह महत्त्वाची बैठक

Coronavirus : ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधानांची आज उत्पादकांसह महत्त्वाची बैठक

Subscribe

देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून कोरोना रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये कोरोना (Corona) स्थिती नियंत्रणाबाहेर जात असून आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. दरम्यान अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांना गंभीर अ़डचणींना समोरे जावे लागत आहे. याचपार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi)महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत.

या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. यासाठी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशातील बड्या ऑक्सिजन उत्पादकांशी चर्चा करणार आहेत. यावेळी देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा कशाप्रकारे वाढवत येईल यावर चर्चा होईल. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह चर्चा करणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठ्या संदर्भात माहिती दिली. या उच्चस्तरीय बैठकीत मोंदींनी ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी तीन उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पहिला उपाय म्हणजे ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात, तर दुसरा ऑक्सिजन वितरणाची गती वाढवण्याचा आणि तिसरा आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी नवीन उपाययोजना करत पुरवठा जलद
करणे.

या उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधला जात आहे. सध्यस्थितीत भारतातील 20 राज्यांना दररोज 6,785 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता आहे, या मागणीनुसार 21 एप्रिलपासून या राज्यांना केंद्राकडून दररोज 6,822 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, तसेच, खासगी आणि सार्वजनिक पोलाद उद्योग तसेच ऑक्सिजन उत्पादकांच्या योगदानामुळे गेल्या काही दिवसांत दररोज 3,300 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती वाढली आहे.


देशात कोरोनाचा उद्रेक कायम! २४ तासात ३ लाख ३२ हजारांहून अधिक नवे रूग्ण; २,२६३ जणांचा बळी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -