छत्तीसगडच्या ‘या’ गावात फक्त ४ मतदार

छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पण छत्तीसगडच्या १४३ मतदार केंद्रातील मतदार संघात असणाऱ्या शेरानदांध गावामध्ये फक्त ४ मतदार आहेत.

chhattisgarh village has only 4 voters
छत्तीसगडच्या एका गावात ४ मतदार

छत्तीसगड जिल्ह्यामध्ये एक असे गाव आहे ज्या गावात फक्त चार मतदार आहेत. छत्तीसगडच्या १४३ मतदार केंद्रातील मतदार संघात असणाऱ्या शेरानदांध गावामध्ये फक्त ४ मतदार आहेत. आश्चर्य म्हणजे या ४ मतदारांपैकी ३ जण एकाच कुटुंबातील आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने छत्तीसगडच्या दुर्गम भागातील मतदारांना मतदानाची संधी मिळवून देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. या दरम्यान शेरानदांध गावामध्ये मतदारांशी बोलताना या गावात फक्त ४ मतदार असल्याचे समोर आले आहे.

एका गावात फक्त ४ मतदार

जिल्हा निवडणुक अधिकारी एन. के. दुर्गा यांनी सांगितले की, शेराददांध गावामध्ये मतदान अधिकाऱ्यांचा एक गट मतदानाच्या एक दिवस आगोदार जाऊन तिथे तंबू उभा करणार आहे. हा तंबू म्हणजेच मतदान केंद्र यामध्ये हे ४ मतदार येऊन मतदान करणार आहेत. शेरानदांध हे गाव जंगलात आहे. तिथे पोहोचण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना खडकाळ डोंगराळ प्रदेशातून ५-६ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. मुख्य रस्त्यापासून हे गाव १५ किलोमीटरवर आहे.

दोन टप्प्यात होणार मतदान

छत्तीसगडमध्ये २ टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दक्षिण भागातील १८ मतदार संघांमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होईल. तर २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. ११ डिसेंबरला दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी होईल.