घरताज्या घडामोडीचीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, अमेरिकेलाही टाकलं मागे

चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, अमेरिकेलाही टाकलं मागे

Subscribe

जगातील महासत्ताक देश असलेल्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. गेल्या दोन दशकात चीनची वैश्विक संपत्ती तीन पटीने वाढल्याने जगातील श्रीमंत देशाच्या यादीत चीनने पहीला क्रमांक पटकावला आहे. मॅकिन्से अँड कंपनीच्या रिसर्च आर्मीने अहवालात याबदद्ल माहिती दिली आहे.

दहा श्रीमंत देशाच्या राष्ट्रीय बँलन्सची तपासणी केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ब्लूमबर्ग वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मॅकिन्से ग्लोबल इन्स्टीट्यूटचे पार्टनर जान मिशके यांनी आम्ही आता आधीपेक्षा जास्त श्रीमंत झाल्याचे सांगितले. मॅकिन्से अँड कंपनीने केलेल्या या संशोधनानुसार २०२० मध्ये १५६ ट्रिलियन डॉलरपासून जगात शुद्ध संपत्तीत ५१४ ट्रिलियन डॉलर झाली आहे.

- Advertisement -

२०२० मध्ये चीनची संपती वाढून १२० ट्रिलियन डॉलर झाली. जी २००० मध्ये अवघी ७ ट्रिलियन डॉलर होती. यामुळे २० वर्षात ११३ ट्रिलियन डॉलरने चीनच्या संपतीत वाढ झाली आहे. यामुळे चीन जगातील सर्वात श्रीमंत देश झाला आहे. तर अमेरिकेची संपती $90 ट्रिलियनने वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -