घरदेश-विदेशचीन दहतवाद्यांना मदत करतोय जगाने लक्ष द्यावे - म्यानमार 

चीन दहतवाद्यांना मदत करतोय जगाने लक्ष द्यावे – म्यानमार 

Subscribe

दक्षिणपूर्व आशियातील चीनचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या म्यानमारनेही  आता  चीन दहशतवादी आणि विघटनवादी गटांना शस्त्र पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यासाठी आता याकडे जगाने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन म्यानमारचे ज्येष्ठ जनरल मीन ऑंग हिलिंग यांनी केले.

म्यानमारने दहशतवादी गटांना दडपण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली आहे. नुकत्याच रशियाद्वारे चालवल्या जाणार्‍या टीव्ही चॅनल झेव्हेदाला दिलेल्या मुलाखतीत म्यानमारचे ज्येष्ठ जनरल मीन ऑंग हिलिंग म्हणाले की म्यानमारमध्ये कार्यरत दहशतवादी संघटनांना ‘शक्तिशाली सैन्यांचा’ पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना संपवण्यासाठी इतर देशांची मदत घेत आहोत. ‘शक्तिशाली सैन्यांचा’ संदर्भ म्यानमारचा शेजारचा चीन म्हणून पाहिला जात आहे.

- Advertisement -

म्यानमारच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल जू मीन तुन यांनी म्यानमारच्या सशस्त्र दलाचे सर-सेनापती-कमांडर यांनी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. प्रवक्त्याने सांगितले की, सैन्य प्रमुख पश्चिम म्यानमारमधील राखिन राज्यात सक्रिय दहशतवादी संघटना असलेल्या अरकान आर्मी (एए) आणि अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी (एआरएसए) याचा संदर्भ घेत होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये म्यानमारच्या सैन्याने बंदी घातलेल्या नॅशनल लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, ज्यात हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा साथ जप्त केला होता. त्या प्रत्येकाची किंमत ७० ते ९० हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. याचा थेट संबंध चीनशी येतो, असेही ते म्हणाले. लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल तुन न्ये म्हणाले होते की जप्त केलेले बहुतेक शस्त्रे ‘चिनी शस्त्रे’ होती. तथापि, चीनने म्यानमारमधील दहशतवादी गटांना शस्त्रे पुरविल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे, परंतु म्यानमारचा संशय कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -