घरदेश-विदेशVideo: मिरच्या खाण्याची अनोखी स्पर्धा

Video: मिरच्या खाण्याची अनोखी स्पर्धा

Subscribe

ज्या लाल मिरचांच्या नावाने आपल्या डोळ्यात पाणी येतं, त्याच मिरच्यांच्या तलावामध्ये डुंबायला आणि तिथेच बसून त्या मिरच्या खायला तुम्हाला सांगितलं तर...

जगभारात चालणाऱ्या अजब-गजब स्पर्धा आणि फेस्टिव्हल्स आपल्याला नवीन नाहीत. मग तो तामिळनाडूमधला पारंपारिक ‘जलिकट्टू’ खेळ असो किंवा स्पेनमध्ये होणारा ‘टोमॅटिनो फेस्टिव्हल’. अशाप्रकारचे चित्रविचित्र खेळ संपूर्ण जगात अनेक वर्षांपासून चालत आले आहेत. चीनमध्येही सध्या असंच एक निराळं फेस्टिव्हल सुरु आहे. दक्षिण चीनमधील हुनान प्रांतामध्ये चक्क ‘चिली फेस्टिव्हल’ भरवण्यात आलं आहे. याठिकाणी लाल मिरच्यांच्या तलावात डुंबण्याची आणि तलावात बसूनच त्या मिर्च्या खाण्याची एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्या लाल मिरचांच्या नुसत्या नावाने आपल्या डोळ्यात पाणी येतं, त्याच मिरच्या मनोसक्तपणे खाण्याचा आनंद इथले लोक घेत आहेत. हुनानमध्ये भरवण्यात आलेल्या या चिली फेस्टिव्हलंच हे तिसरं वर्ष असून, याहीवर्षी लोक मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

मिरची खाण्याचा विक्रम

मिरच्या खाण्याच्या स्पर्धेत तेंग शुआईहुई नावाच्या माणसाने ६० सेंकदांत ५० मिरच्या खाण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे हा विक्रम करणाऱ्या माणसाला चक्क २४ कॅरेटचे ३ ग्रॅम वजनी नाणे देण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये एकूण १० स्पर्धक पोहचले होते. या स्पर्धेत एका मिनिटात जो सर्वात आधी ५० मिरच्या खाईल, त्याला विजेता घोषित केलं जातं. तेंगने सर्वात आधी ५० मिरच्या खात ही स्पर्धा जिंकली.

- Advertisement -
व्हिडिओ सौजन्य- CGTN

डॉक्टर ऑन ड्युटी

या गजब फेस्टिव्हलमध्ये मिरच्यांचा एक कृत्रीम तलाव केला जातो. तब्बल ३ टन लाल मिरच्या तलावामध्ये टाकल्या जातात आणि स्पर्धेचा भाग म्हणून लोकांना त्यामध्ये अंघोळ करायला सांगण्यात येतं. याशिवाय लाल मिरच्या खाण्याचा टाक्स देखील स्पर्धकांना दिला जातो. अशावेळी एखाद्याला या गोष्टींचा त्रास होऊन मेडिकल इमर्जन्सी उद्भवण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून फेस्टिव्हलच्या ठिकाणी कायमच डॉक्टरांची एक टीम तैनात केलेली असते. तसंच स्पर्धकांच्या त्वचेला त्रास होऊ नये म्हणून कमी तिखट मिरच्यांचा स्पर्धेसाठी वापर केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -