घरदेश-विदेशभारत-अमेरिकेत होणार कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल!

भारत-अमेरिकेत होणार कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल!

Subscribe

दोन्ही देश सयुक्तरित्या कार्य करत असल्याने भारतासह अमेरिकेलाही याचा मोठा फायदा होणार आहे.

कोविड १९ विरुद्ध लढण्यासाठी अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश एकत्रितरित्या काम करत आहे. संयुक्त संशोधन, अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कोरोना व्हायरसवर आयूर्वेदिक औषधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. दोन्ही देशातील आयुर्वेदिक तज्ञ, डॉक्टर्स कोरोना व्हायरसविरुद्ध आयूर्वेदिक फॉर्म्यूल्यावर क्लिनिकल ट्रायल करण्याची योजना आखत आहे. त्याला भारतीय राजदूताने याला दुजोरा दिला आहे.

प्रतिष्ठित भारती-अमेरिकन वैज्ञानिक, विद्वान आणि डॉक्टरांच्या समुहाशी बोलताना अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजीत सिंह संधू म्हणाले की, संस्थात्मक भागीदारीच्या विस्तृत नेटवर्कद्वारे कोव्हिड – १९ विरोधीतल लढ्यात दोन्ही देशांचे वैज्ञानिक एकत्र आले आहेत. संस्था संयुक्तरित्या संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी एक आल्या आहेत. दोन्ही देशातील आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यात आयुर्वेदिक औषधांच्या संयुक्त क्लिनिकल चाचणीसाठी एकत्र येण्याचा विचार करत आहेत. तर यासह वैज्ञानिक माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करत आहेत.

- Advertisement -

तरंजीत संधू म्हणाले की, सर्वसामान्यांना परवडणा-या आणि कमी किंमतीत आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती करण्यात भारतीय फार्मास्युटीकल्स कंपन्या अग्रसेर आहे. त्यामुळे महामारी सारख्या साथीच्या रोगाचा नायनाट करण्यासाठी भारतीय फार्मास्युटीकल्स कंपन्यांचे मोठे योगदान असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तरंजीत संधू यांच्या मते, सध्या अमेरिकेतील संस्था आणि भारतीय लस निर्मिती कंपन्यांमध्ये कमीतकमी तीन भारतीय सहयोगी काम करत आहेत. दोन्ही देश सयुक्तरित्या कार्य करत असल्याने भारतासह अमेरिकेलाही याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढाईत हे मोठं यश असेल, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय औषध कंपन्या स्वस्त औषध आणि लस बनवण्यामध्ये पुढे आहेत व या महामारीच्या लढाईत देखील महत्त्वाची भूमिका बजावतील. अमेकितेतील संस्थेंसोबत भारतीय औषध कंपन्यांचे कमीत कमी तीन करार झाले आहेत.


भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे बरं वाटतंय – ब्राझीलचे राष्ट्रपती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -