घरCORONA UPDATECovid-19: बिल गेट्स यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

Covid-19: बिल गेट्स यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

Subscribe

जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोन विषाणूच्या संदर्भात करत असलेल्या उपाययोजनांसाठी त्यांचे कौतुक केले आहे.

जगभरात कोविड-१९ शी लढा सुरू असताना पुन्हा एकदा भारताची मान उंचावेल अशी घटना घडली आहे. जगप्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोरोन विषाणूच्या संदर्भात करत असलेल्या उपाययोजनांसाठी त्यांचे कौतुक केले आहे. अशा कठिणप्रसंगी तुमचे नेतृत्व खरोखरच देशाला योग्य दिशाला दाखवणारे असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातून भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याबाबत चांगले मत येत असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले बिल गेट्स 

औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपनी मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यानी मोदींच्या कौतुकासंबंधीचे एक पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान म्हणून तुम्ही आणि तुमच्या सरकारने केलेल्या उपाययोजना खरोखरच कौतुकास पात्र आहे. देशातील हॉटस्पॉटची वर्गवारी, लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी वेळेत केलेले लॉकडाऊन आणि क्वारंटाइन तसेच आरोग्यविषयक केलेल्या सोयी-सुविधा यांचे नियोजन उत्तमरित्या केले आहे, असे बिल गेट्स म्हणाले. तसेच भारत सरकारने कोरोना विषाणूच्या ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आरोग्य सेवेतील लोकांशी संपर्कात राहण्याकरता बनवलेल्या आरोग्य सेतू अॅपचेही त्यांनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. गेल्या महिन्याभरातील ही अशा पद्धतीची तिसरी बैठक असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेत येत्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -