घरअर्थजगत३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा 'ही' महत्त्वाची कामं; अन्यथा भरावा लागेल दंड

३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा भरावा लागेल दंड

Subscribe

२०२१ वर्ष संपायला फक्त एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे तुमची ही महत्त्वाची कामं जर शिल्लक असतील तर ती वेळेत पूर्ण करा. कारण ही कामं बाकी असतील तर तु्म्हालाही दंड भरावा लागू शकतो. जाणून घ्या कोणती कामं आहेत जी तुम्हाला ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी लागतील.

आयकर रिटर्न

गेल्या आर्थिक वर्षासाठी (२०२०/२०२१) आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत महामारीमुळे अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. जर सरकारने आयटीआर दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढवली नाही तर तुम्ही गंभीर संकटात सापडाल. त्यामुळे लवकरात लवकरं आयटीआर दाखल करा. जर तुम्ही आयटीआर दाखल करण्याची ३१ डिसेंबरची अंतिम मुदत चुकवली तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

- Advertisement -

पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल

निवृत्त सरकारी कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र अद्याप सादर केले नसेल तर तुम्ही लवकरचं ते सादर करा.

यूएएनशी आधार करा लिंक

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कामगार मंत्रालयाने या वर्षाच्या सुरुवातीला काही राज्यांनी कामगारांना UAN ला आधारला लिंक करण्याची मुदत चार महिन्यांनी वाढवून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत केली. मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत दोन महिन्यांसाठी रिटर्न उशीरा भरल्याबद्दल नियोक्तांवर लादलेला दंडही माफ केला.

- Advertisement -

विशेष म्हणजे, तुमचे EPF खाते आधारशी लिंक केल्याने क्लेम सेटलमेंट प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होऊ शकते. ईपीएफओच्या युनिफाइड पोर्टलनुसार, जर तुम्हाला तुमच्या ईपीएफसाठी ऑनलाइन दावा दाखल करायचा असेल तर यूएएनशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे.


एका बैलाच्या शौर्यासमोर दोन वाघांची ताकदही पडली फिकी; नेमकं काय घडलं?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -