घरताज्या घडामोडीनव्या काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे, २१ मिनिटांच्या भाषणात १० वेळा...

नव्या काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे, २१ मिनिटांच्या भाषणात १० वेळा राहुल-सोनियांचा उल्लेख

Subscribe

खरगे म्हणाले की, आपल्या सगळ्यांना मिळून एक भारत निर्माण करायचा आहे. जिथे सगळ्यांसाठी समान अधिकार असेल. सगळ्यांना सन्मान मिळेल. रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. जेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आपल्यामधील भीती दूर करेल तेव्हा मोठी ताकदसुद्धा आपल्यासमोर झुकेल.

काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये खरगे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. देशातील सगळ्यात जुन्या पक्षाची जबाबदारी आता मल्लिकार्जून खरगे यांच्यावर असणार आहे. खरगे यांनी २१ मिनिटांचे भाषण केले यामध्ये त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. तसेच १० वेळा राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी काँग्रेसचे सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात खरगे काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष होते. काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी खरगे यांना जबाबदारी दिली आणि सत्कार केला. सुरुवातीला सोनिया गांधी यांनी भाषण केले यानंतर खरगे २१ मिनिटांचे भाषण करतात. या भाषणात त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासासह पक्षाचा इतिहास सांगितला. तसेच भविष्यातील एजेंडासुद्धा त्यांनी यावेळी मांडला. भाजप आणि संघावर निशाणा साधण्यात आला. तसेच खरगेंनी आपल्या भाषणात १० वेळा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दोघांचंही तोंडभर कौतूक खरगे यांनी केलं आहे.

- Advertisement -

खरगेंनी मानले आभार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांचे आभार मानले आहेत. आज माझ्यासाठी हा भावूक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. एका कर्मचाऱ्याचा, शेतकऱ्याचा मुलगा आणि सामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडला ही सन्मानाची बाब आहे. यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. जी यात्रा मी १९६९ मध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या रुपात सुरु केली होती. त्याला तुम्ही या पदापर्यंत पोहचवलं असल्याचे खरगे म्हणाले.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना दिलं वचन

दरम्यान खरगे पुढे म्हणाले की, ज्या महान राजकीय पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधी, पं. जवाहर लाल नेहरू, सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, मौलाना आजाद, बाबू जगजीवन राम, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी केले. त्या पक्षाची जबाबदारी आणि सांभाळणे माझ्यासाठी सोभाग्याची तसेच गौरवास्पद बाब आहे. काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना आश्वासन देतो की, मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करेल असे खरगे म्हणाले.

- Advertisement -

सोनिया गांधींचे मानले आभार

काँग्रेसच्या करोडो कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे खरगेंनी आभार मानले आहेत. त्यांचे बहुमूल्य योगदान पक्षाला लाभले आहे. सोनिया गांधी यांनी रात्रंदिवस निःस्वार्थ भावनेतून पार्टीला सांभाळले आहे. सोनिया गांधी नेहमी योग्य मार्गावर चालत राहिल्या आणि त्याग समर्पणातून एक आदर्श त्यांनी ठेवला आहे. त्यांच्यासारखे दुसरे उदाहरण मिळणं कठिण असल्याचे खरगे म्हणाले.

खरगेंचे जनतेला आवाहन

मल्लिकार्जून खरगे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या लोकशाहीची स्थापना काँग्रेसने केली त्याला बदलण्याची वेळ आली आहे. कोणी विचारही केला नव्हता की देशात अशी राजकारण सुरु होईल ज्यामध्ये खोट्याची चर्चा होईल आणि सत्तेत बसलेले लोकशाहीला कमजोर करण्याचा प्रयत्न करतील. परंतु या सगळ्याला आपण तोडून टाकू. अनेक लोकं काँग्रेससोबत जोडले नाहीत पण त्यांना देशाला वाचवण्याची इच्छा आहे. त्यांना आवाहन करतो की, काँग्रेससोबत या आपण सोबत लढा देऊ असे आवाहन खरगे यांनी केलं आहे.

राहूल गांधींप्रति आभार व्यक्त

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे आभार व्यक्त करत खरगे म्हणाले की, काँग्रेसचे दुःख त्यांनी ओळखले आणि भारत जोडो यात्रेवर ते निघाले आहेत. ते लोकांना भेटत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. शेतकरी, महिला, लहान मुलं, युवा, प्रौढ सगळ्या लोकांना ते भेटत आहेत. राहुल गांधी यांनी लोकांमध्ये जाऊन आपल्या कार्यकाळाला धार दिली आहे.

कार्यकर्ता आणि नेत्यांमध्ये उत्साह निर्माण केला

नव्या काँग्रेस अध्यक्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. खालच्या स्तरावरील कार्यकर्ता आज अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या भावना ओळखून आहे. आपण पुन्हा एकदा सगळे सोबत मिळून कामाला सुरुवात करु आणि प्रत्येक अडथळा दूर करु असे आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

तरुण, दलित आणि अल्पसंख्यांकांना मदत

पक्षात युवा कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची संधी देण्यात येणार आहे. पक्षात ५० टक्के आरक्षण ५० वर्षांखालील कार्यकर्त्यांसाठी असेल. युवा कार्यकर्त्यांचे मागण्या पूर्ण करण्यात येतील. ब्लॉक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षात भरती करण्यात येईल. उदयपूरमध्ये पार्टीने जे जे निर्णय घेतले ते लागू करण्यात येतील.

भाजप, संघावर हल्लाबोल

खरगे यांनी भाजपवसुद्धा हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारच्या अराजकेविरोधात सडेतोड उत्तर देण्यात येईल. भाजप आणि संघाचे स्वप्न आहे की, देश विरोधी पक्षमुक्त झाला पाहिजे. भाजप न्यू इंडियाबद्दल बोलत असते परंतु कसला न्यू इंडिया आहे. ज्यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अत्याचार करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. जनता महागाईविरोधात त्रस्त आहे. सरकार आपल्या काही मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे. उपासमार देशात वाढली आहे. शिक्षण महागले आहे. रुपयाची घसरण होत आहे. ईडी, सीबीआय आणि आयटी पैशांसाठी २४ तास काम करत आहे, अशा शब्दात खरगे यांनी हल्लाबोल केला आहे.

दलित- आदिवासींचा भाजपकडून अपमान

भाजपच्या न्यू इंडियामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि शोषित समाजाचा अपमान करण्यात येत आहे. त्यांची संधी हिरावली जात आहे. आता न्यू इंडियामध्ये खऱ्याचे खोटं आणि खोट्याचे खरं करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलून संघाचे संविधान आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. परंतु असे आम्ही होऊ देणार नाही असे खरगे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या मंत्रानुसार पुढे जाऊ

खरगे म्हणाले की, आपल्या सगळ्यांना मिळून एक भारत निर्माण करायचा आहे. जिथे सगळ्यांसाठी समान अधिकार असेल. सगळ्यांना सन्मान मिळेल. रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. जेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आपल्यामधील भीती दूर करेल तेव्हा मोठी ताकदसुद्धा आपल्यासमोर झुकेल. यावेळी खरगेंनी राहुल गांधींची आठवण सांगितली. राहुल गांधी नेहमी सांगतात जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरु नका ते नेहमी सांगतात की घाबरु नका हेच वाक्य आपण पुढे घेऊन जायचे आहे असे खरगे भाषणादरम्यान म्हणाले.


हेही  वाचा : अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मल्लिकार्जुन खर्गेंनी केली मोठी घोषणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -