घरदेश-विदेशसोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिटनला; राहुल गांधी प्रियंका गांधीही जाणार सोबत

सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिटनला; राहुल गांधी प्रियंका गांधीही जाणार सोबत

Subscribe

दरम्यान काँग्रेस 4 सप्टेंबरला महागाई आणि बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात भव्य रॅली काढणार आहे. या रॅलीसाठी मुंबईत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग होणार आणि रामलीला मैदानही गाजवणार अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी ब्रिटनला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा देखील जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी दिली आहे.

रमेश यांनी एका निवेदनात म्हटले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार आहेत. मात्र सोनिया गांधी नेमक्या केव्हा परदेशात जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानात होणाऱ्या काँग्रेसच्या महागाईवर हल्लाबोल रॅलीला खासदार राहुल गांधी उपस्थित राहणार आहे. दिल्लीत परतण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या आजारी आईचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सोनिया गांधी यांना अलीकडेच कोरोनाची लागण झाली होती. मात्र सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी अशावेळी जात आहे जेव्हा काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि पक्षाध्यक्षपदासाठी निवडणुकीची तयारी सुरु आहे.

दरम्यान काँग्रेस 4 सप्टेंबरला महागाई आणि बेरोजगारीविरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानात भव्य रॅली काढणार आहे. या रॅलीसाठी मुंबईत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग होणार आणि रामलीला मैदानही गाजवणार अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. 4 सप्टेंबरला भाजपच्या मोदी सरकारविरोधात देशविरोधी चुकीचे धोरण, वाढती महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रामलीला मैदानात काँग्रेसची भव्य रॅली निघणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने 6 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.

- Advertisement -

यानंतर 7 सप्टेंबरपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी मुंबई ते दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये भारत जोडो यात्रेबाबत रणनिती आखली जात आहे. 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून या यात्रा निघणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात होणार असून 3 हजार 500 किमी अंतर कापून ही यात्रा काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसने या यात्रेसाठी सामाजिक संघटना त्यांचे प्रतिनिधी आणि समविचारी लोकांना सहभागी होण्याचे आवहन केले आहे.


गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडीचे विघ्न टळणार?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -