घरताज्या घडामोडीGen Bipin Rawat: शेवटच्या क्षणी रावत यांनी पाणी प्यायला मागितले पण...: घटनेमुळे...

Gen Bipin Rawat: शेवटच्या क्षणी रावत यांनी पाणी प्यायला मागितले पण…: घटनेमुळे प्रत्यक्षदर्शनीची उडाली झोप

Subscribe

तामिळनाडूच्या कुन्नूरमधील बुधवारी झालेल्या लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये देशाचे पहिले CDS बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच या दुर्घटनेचा उच्च स्तरावर तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त होत आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या घटनास्थळी मदतीस काही स्थानिक नागरिक पोहोचले होते. त्यामधील एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेबाबत एनडीटीव्ही मुलाखत दिली आहे. शेवटच्या क्षणी बिपीन रावत यांनी त्यांच्याकडे पाणी मागत होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या घटनेमुळे या प्रत्यक्षदर्शनीला झोप सुद्धा लागली नसल्याचे सांगितले आहे. कोण होता हा प्रत्यक्षदर्शीनी आणि काय होता त्याचा हा थरारक अनभुव वाचा…

या प्रत्यक्षदर्शीचं नाव शिवकुमार असे होते. शिवकुमार यांनी त्या दिवशी काय घडले याबाबत सांगितले की, ‘चहाच्या बागेमध्ये काम करणाऱ्या भावाला भेटण्यासाठी शिवकुमार निलगिरीच्या डोंगरावर गेले होते. त्याच दरम्यान पेट घेतलेले हेलिकॉप्टर पडले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर पडले त्या ठिकाणी जाणे खूप कठीण होते. सुरुवातीला हेलिकॉप्टमधून त्यांनी जळत असलेले तीन व्यक्ती पडताना पाहिले. घटनास्थळी पोहोचल्यावर हेलिकॉप्टरच्या बाजूला दोन व्यक्तीचे मृतदेह पडलेले होते. पण तिथे असलेला एक व्यक्ती जिवंत होता. मात्र त्याला ओळखणे कठीण होते. त्यामुळे आम्ही त्यावेळी त्यांना सगळे काही ठिक होईल, काळजी करू नका, असे सांगितले. मग त्यादरम्यान त्या व्यक्तीने पिण्यास पाणी मागितले. पण आमच्या जवळ पाणी नव्हते. त्यानंतर एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांना घेऊन गेले.’

- Advertisement -

शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, ‘मग त्यांचा फोटो दाखवल्यानंतर पिण्यासाठी पाणी मागणारे ते व्यक्ती बिपीन रावत असल्याचे समजले. या घटनेचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला असून मी खूप अस्वस्थ झालो आहे. मला रात्रभर झोपसुद्धा येत नाही. देशसेवेसाठी ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य पणाला लावले त्या व्यक्तीला शेवट्या क्षणी पाणीसुद्धा देऊ शकलो नाही, या विचारानेच माझी झोप उडाली आहे. बिपीन रावत आज आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. ज्यावेळेस मी बिपीन रावत यांना पाहिले त्यावेळेस ते खूप गंभीर जखमी झाले होते. काश मी त्यांच्यासाठी काही करू शकलो असतो.’


हेही वाचा – China on Bipin Rawat Death : रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला भारतीय लष्कर जबाबदार; चीनचा कांगावा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -