घरदेश-विदेशChina on Bipin Rawat Death : रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला भारतीय लष्कर...

China on Bipin Rawat Death : रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला भारतीय लष्कर जबाबदार; चीनचा कांगावा

Subscribe

तामिळनाडू कुन्नुर हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांचे निधन झाले. त्यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि १२ जवानही या अपघातात मृत्यूमूखी पडले. या घटनेवर आत्ता जगभरातून शोक व्यक्त होत असताना कपटी चीनने मात्र गरळ ओकली आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून भारताच्या लष्कराच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या अपघातासाठी भारतीय सैन्यातील त्रुटी जबाबदार असल्याची निर्लज्ज टीपण्णी केली आहे.

चीनने ग्लोबल टाईम्समध्ये काय लिहिलेय?

भारताचा शेजारी देश चीनचा संवेदनाहीन चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून भारताच्या लष्कराच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनने जनरल रावत यांच्या मृत्यूला भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ग्लोबल टाईम्सने लिहिले की, “भारताच्या संरक्षण प्रमुखाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यामुळे भारतीय लष्करातील शिस्त आणि युद्ध तयारीचा अभावच फक्त उघड झाला नाही तर, देशाच्या लष्करी आधुनिकीकरणालाही मोठा धक्का बसला आहे. चीनविरोधी भारतीय संरक्षण अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतरही दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात भारताच्या आक्रमक भूमिकेत बदल होण्याची शक्यता नाही.

ग्लोबल टाइम्सने बिपिन रावत यांना म्हटले चीनविरोधी

ग्लोबल टाइम्सने भारताविरोधात गरळ ओकत लिहिले की, जनरल बिपिन रावत हे चीनविरोधी होते. मात्र या घटनेनंतर भारतीय सैन्यात शिस्तीचा अभाव दिसून येतोय. भारतीय लष्कराचा जगातील सर्वोच्च सैन्यात समावेश आहे, चीन त्याला अनुशासित लष्करी संस्कृती असल्याचे सांगत आहे. भारतीय लष्कराने एसओपीचे पालन केले नाही, असे चीन म्हणत आहे. जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी श्रीलंकेचे लष्करप्रमुख भारतात येत आहेत.

- Advertisement -

माजी लष्करप्रमुखांनी चीनला दिले उत्तर

माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक यांनी भारतीय लष्करावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या ग्लोबल टाइम्सला चोख प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “चीनला सामाजिक नैतिकता आणि मूल्यांचा विसर पडला आहे, मग आम्ही पीएलएकडून काय अपेक्षा करू शकतो? CDS बिपिन रावत यांच्या मृत्यूवर चिनी मुखपत्राने असंवेदनशील आणि अयोग्य टिप्पणी केली आहे. कोणताही देश सहानुभूती आणि नैतिकतेचा अभाव कसा दाखवू शकतो? पण हा चीन आहे. त्यांच्याकडे मानवाधिकारांचे उल्लंघन आणि युद्ध गुन्ह्यांचा इतिहास आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -