घरताज्या घडामोडीकोरोनाचा पुन्हा एकदा नागरिकांना धसका, लसीकरणाच्या संख्येत वाढ

कोरोनाचा पुन्हा एकदा नागरिकांना धसका, लसीकरणाच्या संख्येत वाढ

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा देशात वाढत आहे. कोरोना संक्रमणाचा धोका वाढल्याने केंद्र सरकारने उपाययोजना जारी केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परंतु नागरिकांनी कोरोनाचा धसका घेतला असून लसीकरणाच्या संख्येत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी ४ हजार नागारिकांनी लसीकरण केलं होतं. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी हा आकडा ५७ हजारांच्या वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे टू-ड्रॉप नोजल व्हॅक्सीनला परवानगी देण्यात आली आहे. कोविन अॅपवर यासंबंधीत अधिक माहिती उपलब्ध आहे. मात्र, आता ही व्हॅक्सीन रुग्णालयात देखील उपलब्ध असणार आहे.

- Advertisement -

भारतात कोरोना विषाणूचे १६३ नवीन प्रकरणं समोर आले आहेत. संक्रमित झालेल्या ४ कोटींपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९८ टक्के इतकी आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दोन आहे. तर दिल्लीत रुग्णांच्या मृत्यूची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.

नेजल लसीचे वैशिष्ट्य काय?

- Advertisement -
  • आतापर्यंत निर्मिती झालेल्या कोरोना प्रतिबंध लस इंजेक्शनमार्फत देण्यात आली. मात्र ही लस वेगळी. ही लस नाकावाटे देण्यात येते.
  • तुम्ही घरच्या घरीही ही लस घेऊ शकता. यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांचीही गरज नाही.
  • इंजेक्शनद्वारे घेण्यात येणाऱ्या लसीमुळे त्वचेवर जखम होण्याची शक्यता असते. मात्र, या लसीमुळे जखम होण्याची शक्यता नाही.
  • लहान मुले आणि वृद्धांसाठी ही अत्यंत सुरक्षित लस आहे.
  • सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विषाणूचा संसर्ग होण्याआधीच त्या विषाणू मारण्याचं काम या लसीद्वारे होतं. त्यामुळे शरीरावर पुरळ उठणे किंवा लसीमुळे उद्भवणारे इतर कोणतेही साईड इफेक्ट्स या लसीमुळे होणार नाहीत.

    हेही वाचा : आता नाकावाटे कोरोना प्रतिबंध लस, केंद्राने दिली


mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -