घरदेश-विदेशनेपाळच्या कारागृहातून अखेर चार्ल्स' सुटला

नेपाळच्या कारागृहातून अखेर चार्ल्स’ सुटला

Subscribe

भारत, थायलंड, तुर्कस्तान, ईराण, ग्रीकसह दक्षिण आशिया देशातील अनेक देशांमध्ये चार्ल्स विरोधात गुन्हे दाखल होते. बिकनी किलर व द सर्पंट, अशी चार्ल्सची ओळख होती. त्याच्याविरोधात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. मुलींशी मैत्री करुन तो त्यांना गळ घालायचा. नंतर त्यांची हत्या करायचा. खुनाचा सुगावा लागण्याआधीच तो फरार व्हायचा. पळून जाण्यात त्याचा एवढा हातखंडा होता की तिहार कारागृहातूनही तो पळून गेला होता.

नवी दिल्लीः दक्षिण आशिया खंडात ज्याची दहशत होती. १२ देशांचे पोलीस ज्याच्या मागावर होते. बिकनी किलर अशी ज्याची ओळख होती. त्या कुख्यात चार्ल्स शोभराची नेपाळच्या कारागृातून शुक्रवारी सुटका करण्यात आली. दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी नेपाळमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र ७० पेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला. त्यांतर्गत चार्ल्स शोभराजची सुटका करण्यात आली.

भारत, थायलंड, तुर्कस्तान, ईराण, ग्रीकसह दक्षिण आशिया देशातील अनेक देशांमध्ये चार्ल्स विरोधात गुन्हे दाखल होते. बिकनी किलर व द सर्पंट, अशी चार्ल्सची ओळख होती. त्याच्याविरोधात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते. मुलींशी मैत्री करुन तो त्यांना गळ घालायचा. नंतर त्यांची हत्या करायचा. खुनाचा सुगावा लागण्याआधीच तो फरार व्हायचा. पळून जाण्यात त्याचा एवढा हातखंडा होता की तिहार कारागृहातूनही तो पळून गेला होता.

- Advertisement -

तिहार जेलमधून पळून जाण्याचा त्याचा किस्साही फिल्मी आहे. १९७६ मध्ये त्याला भारतात अटक करण्यात आली. त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले. तेथून पळून जाण्याचा त्याने कट रचला. १९८६ मध्ये वाढदिवसाच्या दिवशी त्याने कारागृहातील कैदी व कर्मचाऱ्यांना फळे व बिस्कीटे खाऊ घातले. त्यात त्याने झोपेचे औषध घातले होते. झोपेचे औषध असलेली फळ व बिस्कीटे खालल्याने कारागृहातील अधिकारी झोपी गेले. चार्ल्सने चार कैद्यांसह कारागृहातून पळ काढला.

मात्र नेपाळमध्ये २००३ मध्ये त्याला अटक करण्यात आली. दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. यासाठी दोषी धरत नेपाळ न्यायालयाने चार्ल्सला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नेपाळमध्ये जन्मठेपेचा कालावधी २० वर्षांचा असतो. मात्र ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केद्यांना सोडून देण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला. त्यामुळे चार्ल्सची सुटका करण्यात आली.

- Advertisement -

कारागृहातून सुटका झाल्यानंतर चार्ल्सला फ्रान्समध्ये त्याच्या घरी पाठवावे, असे आदेश नेपाळ सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे चार्ल्सला आजच फ्रान्सला पाठवायचे आहे. कारण त्याच्या हदयावर झालेल्या शस्त्रक्रियेत काही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे चार्ल्सची पत्नी निहिता बिस्वास यांनी सांगितले.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -