Live Update: गेल्या ४८ मुंबईत ३२९ पोलिसांना कोरोनाची लागण

corona omicron india maharashtra update assembly election 2022 virat kohli 16 january
corona omicron india maharashtra update assembly election 2022 virat kohli 16 january

 

गेल्या २४ तासांत राज्यात ४६ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ३६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख ८१ हजार ६७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७३७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ५१ हजार ८२८ सक्रीय रुग्ण आहेत. सविस्तर वाचा 


गेल्या ४८ तासांत मुंबई ३२९ पोलिसांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. आतापर्यंत १२६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १०२ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.


गेल्या 24 तासात मुंबईत 13 हजार703 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हिच संख्या 16 हजारांहून अधिक होती. बाधित रुग्णसंख्या आज ३ हजारांनी घटली असली तरी मुंबईतील मृत्यू संख्या काही अंशी वाढली आहे. मुंबईत आज गुरुवारी 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा


दिल्लीत सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आजही २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत २८ हजार ८६७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३२ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. सध्या दिल्लीत ९४ हजार १६० सक्रीय रुग्ण आहेत. दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट २९.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे.


पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी भागातील मॅनागुडीमध्ये बिकानेर एक्स्प्रेस (१५६३३) रुळावरून घसल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, या एक्स्प्रेसमध्ये १२०० लोकं प्रवास करत होते. सविस्तर वृत्ता वाचा 


देशात लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्पष्ट संकेत


मुंबै बँक अध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे यांची मुंबै बँकच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.


पंतप्रधान मोदींची ३० राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक सुरू


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबतची आढावा बैठक सुरू होणार


नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल, 15 दिवसानंतर ते कॅमेरासमोर


नितेश राणेंच्या अटक पूर्व जामीनाची सुनावणी पुढे ढकलली, १७ जानेवारी रोजी होणार सुनावणी


संजय राऊत यांनी राकेश टिकैत यांची घेतली भेट, उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार- संजय राऊत


पंतप्रधान मोदींच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत


वरणभात लोन्चा चित्रपट वादात, महेश मांजरेकरांना महिला आयोगाची नोटीस


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी मनिष दळवी यांची निवड,


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी मनिष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकरांनी भरला अर्ज


उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर


माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान आज दुपारी ३.३० वा. भायखळा येथील एटीएस कार्यालयात एटीएस प्रमुखांची भेट घेऊन मालेगाव बॅाम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसंदर्भात चर्चा करून निवेदन देणार आहेत.


सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात


देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 47 हजार 417 नवे कोरोनाबाधित रुग्ण


टिकैत यांच्याशी चर्चा करुन किती जागा लढवणार यावर चर्चा करु, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत यंदा शिवसेनेचे सदस्य असतील, ज्यांना हवा कळली त्यांनी भाजपला रामराम केला, काँग्रेस ज्या जागा कधी जिंकला नाही त्या जागा आम्ही मागितल्या – संजय राऊत


देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत.


सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदाची आज निवडणुक