घरताज्या घडामोडीLive Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा 

Live Update: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा 

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा


राज्यात मागील २४ तासात २३७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज २ जणांचा मृत्यू झालाय. ४५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या २ हजार ७५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक


प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश

- Advertisement -

आज संध्याकाळी काँग्रेस नेत्यांची बैठक


बैठकीत प्रियंका गांधींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार


फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी जवळपास २ तास जबाब नोंदवला.


भगवंत मान यांनी पंजाब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली


राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.


नारायण राणे आणि नितेश राणे यांचा अटकपूर्व दिंडोशी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दिशा सालियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मुंबईच्या मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल


नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस पदाचा दिला राजीनामा


फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला जबाब नोंदवण्यासाठी कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल


देशात गेल्या २४ तासांत २ हजार ८७६ नवे कोरोनाबाधित आढळले असून ९८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार ८८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३२ हजार ८११ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.


दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांशी पंतप्रधान मोदी काय चर्चा करणार याची उत्सुकता लागली आहे.


कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर उडुपीमधील शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू झाल्या आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला होणार आहे. दिशा सालियानबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मुंबईच्या मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यासाठी प्रवीण दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आजच सुनावणी व्हावी यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती करणार आहेत.


आज संपूर्ण देशभरात १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत आहे. मुंबईत आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर १२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून लसीकरण सुरू होणार आहे. सर्व केंद्रांवर १२ ते १४ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -