अमेरिकेत मृत्यूचा हाहाकार! ४० सेंकदाला एका रुग्णाचा बळी

अमेरिकेत तब्बल सहा महिन्यांनंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

coronavirus america fifth wave of coronavirus in america after france
coronavirus: फ्रान्सपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाच्या पाचव्या लाटेची भीती, WHO चिंतेत

हिवाळ्यानंतर जगभरात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. पुन्हा एकदा कोरोनामुळे अनेक देशाची बिकट परिस्थिती होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील कोरोनाच्या यादीत केंद्रस्थानी अमेरिकेतील पुन्हा चिंताजनक परिस्थितीत निर्माण होताना दिसत आहे. माहितीनुसार, अमेरिकेत तब्बल सहा महिन्यांनंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. प्रत्येक ४० सेंकदाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर होतोना दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांनंतर पहिल्यांदा अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच २४ तासांत ४० सेंकदाला एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अमेरिकेची आणखीनच चिंता वाढली आहे. अमेरिकेत अचानक रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नव्या रुग्णांसाठी बेडच रिकामी राहिले नाही आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्येत आणखीन वाढ होऊ शकते, अशी भीती सध्या तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ३१ लाख ३७ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ६८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७८ लाख ५ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. संपूर्ण जगातील कोरोनाबाधितांची संख्या ६ कोटी ७ लाख १६ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख २६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी २० लाख २८ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – मॉडर्नाची कोरोना लस ९४ टक्के यशस्वी; पण फैलाव थांबणार नाही!