घरदेश-विदेशलॉकडाऊन- ५ वर मंथन सुरू! आज कॅबिनेट सचिव राज्यांशी करणार चर्चा

लॉकडाऊन- ५ वर मंथन सुरू! आज कॅबिनेट सचिव राज्यांशी करणार चर्चा

Subscribe

प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असल्याने त्यानंतर लॉकडाऊन वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या संभाव्य पाचव्या टप्प्याबाबत मंथन सुरू झाले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा आज सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांच्यासमवेत बैठक घेतील. प्रथमच बाधित महानगरांचे महानगरपालिका आयुक्तही या बैठकीस हजेरी लावतील. सकाळी ११.३० वाजल्यापासून ही बैठक सुरू होणार, असे सांगण्यात येत आहे.

लॉकडाऊन ५ लागू होण्याची शक्यता

लॉकडाऊन चार संपण्यापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊन ५ लागू होण्याची शक्यता असून ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या मन की बात कार्यक्रमादरम्यान मोदी लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, तर दोन आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्ग असलेल्या शहरात कडक निर्बंध 

मिळालेल्या माहितीनुसार, या लॉकडाऊनमध्ये सरकार लोकांचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, कन्टेन्मेंट झोनमध्ये सूट देण्यात येणार नाही, असे देखील सांगितले जात आहे. येणाऱ्या लॉकडाऊन ५ मध्ये ज्या शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढणारा असेल अशा शहरांमध्ये कडक निर्बंध असतील.

या शहरात लॉकडाऊन कायम

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरात लॉकडाऊन कायम असणार आहे, कारण या शहरांमध्ये कोरोना संक्रमित झालेल्यांपैकी ७० टक्के रुग्ण भारतात आढळले आहेत तर अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता आणि मुंबईमध्ये हे अधिक धोकादायक शहरं असून देशातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण येथे आढळले आहेत.

- Advertisement -

लॉकडाऊन ५ मध्ये सरकार या भागात लॉकडाऊनचे नियम कठोर ठेवणार असून कंटेनमेंट झोन वगळता लोकांना अटींसह सूट देण्यात येईल, परंतु ही सूट एक मोठी जबाबदारी म्हणून सोपविली जाणार आहे.


देशात २४ तासांमध्ये ६ हजाराहून अधिक रुग्ण आढळले; १९४ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -