घरCORONA UPDATEहळदीच्या कार्यक्रमात दिराचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; नवरीला सोडून वर्‍हाडी माघारी

हळदीच्या कार्यक्रमात दिराचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह; नवरीला सोडून वर्‍हाडी माघारी

Subscribe

नवरदेवाच्या भावाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ऐन हळदीचा कार्यक्रम सुरु असताना मिळाली आणि वर्‍हाडी मंडळीच्या अंगावर काटा उभा राहिला. अखेर गुरुवारी सकाळी सात वाजताच पाच-सहा लोकांच्या साक्षीने सप्तपदी झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सावधगिरीचे पाऊल उचलत वर्‍हाडी मंडळी नवरीला न घेताच आपल्या घरी परतल्याची घटना नाशिकरोड जवळील पळसे येथे घडली.

शिलापूर येथील युवकाचे लग्न पळसे परिसरातील कारखाना रोड परिसरात आज (दि.२८) होत असल्याने बुधवारी (दि.२७) सध्याकाळी हळदीचा कार्यक्रम सुरु झाला आणि याचवेळी नवरदेवाच्या मोठ्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नवरदेवाचा भाऊ कोरोनाबाधित असल्याचे समजताच वर्‍हाडी मंडळींमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशा परिस्थितीत प्रत्येकाने लग्न घरातून काढता पाय घेतला. नवरदेवाच्या भावाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच तपासणी होणार असल्याने नवरदेवालाही क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने गुरुवारी सकाळी अवघ्या पाच-सहा लोकांच्या साक्षीने वधू-वरांनी सात फेरे घेतले. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सप्तपदी झाल्यावर वधूला बरोबर न घेताच नवरदेव आपल्या घरी परतले.

- Advertisement -

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या भावाचा विवाह जरी पार पडला असला तरी शासकीय यंत्रणा मात्र सतर्क झाली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथक, पोलीस, महसूल अधिकारी, प्रशासकीय पातळीवर माहिती घेणे सुरु केले आहे. पळसे पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी सांगितले की, नवरदेवाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची यादी बनविण्याचे काम सुरु असून प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. सैय्यद प्रिंप्री येथील वैद्यकीय अधिकारी माधव आहिरे यांनी आज(दि.२८) सकाळी आठ वाजता शिलापूर येथील करोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांची माहिती घेतली असल्याचे सांगितले.

एक प्रतिक्रिया

  1. खरया व बेधडक बातम्या व लेख
    एक निष्पक्ष वुत्तपत्र

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -