घरदेश-विदेशभारतातल्या या गावात कोरोना कधीच येणार नाही

भारतातल्या या गावात कोरोना कधीच येणार नाही

Subscribe

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हात एक असं गुप्त गाव आहे, जिथे आजपर्यंत कधी सूर्याची किरणं पोहचली नाही. ना आतापर्यंत तिथे एकही कोरोनाचं रुग्ण आढळलं. छिंदवाडा जिल्हातील रहस्यमयी पाताळकोटकमधील गावात औषधी वनस्पती, रोपटी आहेत. तसेच गावाच्या चारही बाजूने कातळ आहेत. त्यामुळे या गावात थेट सूर्यप्रकाश ईथे पोहचू शकत नाही. डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या या गावात औषधी झाडाचा खजिना असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळपासून २५० किलोमीटर दूर पाताळकोट गाव वसलेलं आहे. सरकारी महितीनुसार सुमारे, २१ गावं पाताळकोटमध्ये आहेत. परंतु इथे काहीच गावं चांगल्या परिस्थितीत आहेत. इतर ठिकाणी झोपड्या आहेत. भूरिया जमातीचे लोक इथे राहतात.

- Advertisement -

जमिनीपासून ३००० फूट खाली असलेल्या पाताळकोटच्या या गावांमध्ये थेट सूर्यची किरण येत नसल्याने दुपारच्या वेळी संध्याकाळ झाल्यासारख वाटतं. काही वर्षांपूर्वी गावातील लोक दरीच्या खोल भागातून काही उंच ठिकाणावर येऊन स्थाईक झाले. त्यानंतर आता या गावांमध्ये जवळपास चार ते पाच तासांपर्यंत सूर्यप्रकाश राहतो. परंतु अजूनही काही गावांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचतच नाही.

संपूर्ण जगात मागील दीड वर्षापासून कोरोनाचा कहर आहे. परंतु पाताळकोटमधील या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉक्टर ‘नरेश लोधी’ यांनी या भागात एकही कोरोना रुग्ण नसल्याची माहिती दिली. बाहेरीचे लोक इथंपर्यंत पोहचू शकत नसल्याने हेच कोरोना रुग्ण न आढळल्याचं यामागे कारण असू शकतं. अशी महिती समोर आली आहे.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी पाताळकोटच्या गावांमधून बाहेर येण्या जाण्यासाठी, गावातील लोकांच्या प्रवासासाठी दोरी हा एकमेव पर्याय असायचा. परंतु आता गावात पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील गावात पोहोचणं कठीण होतं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -