देशात समूह संसर्गास सुरुवात, IMAचा इशारा

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे परिस्थितीत आणखी बिघडू शकते, असे आयएमए चेअरमन डॉ. व्ही के मोंगा याचं म्हणणं आहे.

coronavirus community spreed started in india said ima
देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधित संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. दररोज ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील कोरोनाबाधित संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान भारतात कोरोना व्हायरसचा समूह संसर्ग सुरू झाला असल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन केला आहे. तसंच देशात रोज ३० हजारांनी रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि हे चिंताजनक असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन म्हटलं आहे.

देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे परिस्थितीत आणखी बिघडू शकते. देशात रोज ३० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. हे वास्तव असून आता कोरोना ग्रामीण भागांनाही विळखा घालत आहे. हे वाईट संकेत आहेत. त्यामुळे हा कोरोनाचा समूह संसर्ग असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. व्ही के मोंगा एएनआयनं वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. पण अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात समूह संसर्ग असल्याचं मान्य करण्यात केलं नाही आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या दाव्याला आव्हान दिलं आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक ३८ हजार ९०२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५४३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ७७ हजार ६१८वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत २६ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ७७ हजार ४२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: जगात झपाट्याने होतोय संसर्ग; १०० तासांत दहा लाख रूग्णवाढ