घरदेश-विदेशभारतात स्वस्त दरात तयार होणार ‘रेमडेसिवीर’; जाणून घ्या, किंमत

भारतात स्वस्त दरात तयार होणार ‘रेमडेसिवीर’; जाणून घ्या, किंमत

Subscribe

Gilead Sciences अँटीव्हायरल ड्रग ‘रेमडेसिवीर’चे जेनेरिक व्हर्जन भारतात लाँच करणार

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. मात्र, ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान, आता या औषधाचं उत्पादन भारतात होणार आहे. यासह या औषधाची विक्रीही करता येणार आहे. भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन भारतात होणार असून भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त गेल्या दिवसांपुर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान एक चांगली बातमी समोर येत आहे. Mylan NV या औषधी कंपनीने सोमवारी सांगितले की, Gilead Sciences अँटीव्हायरल ड्रग ‘रेमडेसिवीर’चे जेनेरिक व्हर्जन भारतात लाँच करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्याची किंमत ४ हजार ८०० रुपये असणार आहे. ज्याची किंमत विकसित देशांच्या तुलनेत ८० टक्के कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच, कॅलिफोर्नियास्थित गिलियडने १२७ विकसनशील देशांमध्ये ‘रेमडेसिवीर’ औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जेनेरिक औषध उत्पादकांशी परवाना देण्याचे सौदे केले आहेत. Mylan पूर्वी, सिप्ला लिमिटेड आणि हेटरो लॅब लिमिटेड या दोन भारतीय औषधी कंपन्यांनीही गेल्या महिन्यात या औषधाची जेनेरिक व्हर्जन बाजारात आणली आहे.

- Advertisement -

सिप्ला कंपनी आपल्या या व्हर्जनला ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीला देणार आहे तर, तर हेटरोने त्याच्या जेनेरिक व्हर्जन कोविफोरची किंमत ५ हजार ४०० रूपये ठेवली आहे. गेल्या आठवड्यात गिलियडने विकसित देशांकरिता ‘रेमडेसिवीर’ची किंमत प्रति रुग्णांना २ हजार ३४० डॉलर्स ठेवली असून पुढील तीन महिने संपूर्ण औषध अमेरिकेला पुरविण्याचे मान्य केले आहे.

Mylanची किंमत प्रति १०० मिलीग्राम निश्चित केली गेली आहे, परंतु कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये किती डोस पूर्ण करावे लागेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. गिलियडच्या मते, पाच दिवस असणाऱ्या उपचारांच्या कोर्ससाठी, एका रुग्णाला या औषधांच्या सहा बॉटल्स आवश्यक असणार आहे.


दिल्लीत कोरोना रूग्णांचा आकडा १ लाख पार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -