घरदेश-विदेशगुजरातमध्ये नाइट कर्फ्यूदरम्यान अ‍ॅब्यूलन्स सायरनवर बंदी

गुजरातमध्ये नाइट कर्फ्यूदरम्यान अ‍ॅब्यूलन्स सायरनवर बंदी

Subscribe

या अ‍ॅब्यूलन्स सायरनमुळे कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिक अधिक बिधरले आहेत.

देशात कोरोना संसर्गाने हैदोस घातला असून गुजरातमधील अहमदाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक रुग्णालयात रुग्णांसाठी जागा अपूरी पडतेय. तसेच रस्त्यांवर दिवसरात्र अ‍ॅब्यूलन्स सायरनचे आवाज ऐकू येतायत. नाईट कर्फ्यूदरम्यान सायरनचा आवाज करत जाणाऱ्या या अ‍ॅब्यूलन्समुळे कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिक अधिक बिधरले आहेत. त्यामुळे गुजरात सरकारने नाईट कर्फ्यूदरम्यान अ‍ॅब्यूलन्स सायरनचे आवाज साइलेंट मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरातमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २० हून अधिक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ट्राफिकची अडचण नसल्या कारणाने सरकारने अ‍ॅब्यूलन्स सायरनचे आवाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरातमध्ये दरदिवसा ७ ते ८ हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. यात अहमदाबाद आणि सुरत शहरातील कोरोनास्थिती अतिशय भयानक आहे. अनेक शहरात रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जाहीर झाल्याने रस्त्यांवर शुकशुकाट असतो. यादरम्यान कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या १०८ अ‍ॅब्यूलन्स सायरनच्या आवाजाने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होतेय. यामुळे गुजरात सरकराने नाईट कर्फ्यूदरम्यान सायरन बंद करुन अ‍ॅब्यूलन्स चालवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गुजरातमधील अनेक हॉस्पीटल फुल आहेत. अहमदाबाद शहरात रुग्णालयांबाहेर अ‍ॅब्यूलन्सची अक्षरश: रांगा लागल्यात. अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत परंतु नव्याने भर्ती होणाऱ्या रुग्णांना रिकामी बेड्स मिळत नसल्याने वाट पाहावी लागतेय. अहमदाबादमधील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयात जवळपास १२०० पेक्षा अधिक बेड्स फुल असल्याने रुग्णांना बाहेरच थांबे लागत आहे. यामुळे प्रशासनाने रुग्णांना अ‍ॅब्यूलन्समध्येच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -