घरदेश-विदेशLive Update : T20 WC ind vs pak, पाकिस्तानकडून भारताचा पराभव, पाकिस्तानची...

Live Update : T20 WC ind vs pak, पाकिस्तानकडून भारताचा पराभव, पाकिस्तानची शानदार खेळी

Subscribe

पाकिस्तानकडून भारताचा पराभव, पाकिस्तानची शानदार खेळी (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


पाकिस्तान संघाच्या १३ षटकांमध्ये ९२ धावा

- Advertisement -

१० षटकांमध्ये पाकिस्तानच्या नाबाद ७१ धावा


५ षटकांमध्ये पाकिस्तानच्या ३८ धावा

- Advertisement -

पाकिस्तानकडून रिझवान आणि कर्णधार बाबर सलामीवीरसाठी मैदानात


T20 WC ind vs pak : भारताचे पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान, (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


भारताचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या शेवटच्या षटकामध्ये तंबूत परतला आहे. भारताने १४७-७ अशा धावा केल्या आहेत.


भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली बाद झाला असून अर्धशतक करण्यात यशस्वी झाला आहे. विराटच्या एकाकी झुंझमुळे भारत चांगल्या स्थितीमध्ये आला आहे.


भारताला पाचवा धक्का, जडेजा १३ धावांवर झेलबाद, भारताच्या १२५ धावा पूर्ण झाल्या असून पाच गडी बाद झालेत.


भारताचे १५ व्या षटकामध्ये ४ बाद १०० धावा केल्या असून भारताचे शतक पूर्ण झाले आहे. विराट कोहलीच्या सर्वोत्कृष्ट खेळीमध्ये भारताला चांगल्या धावा करता आल्या आहेत.


भारतीय संघाला पाठोपाठ धक्के बसत आहेत. आतापर्यंत  भारताला चार धक्के बसले असून फलंदाज रिषभ पंत माघारी परतला आहे. १३ षटकांमध्ये भारतीय संघाने ८७ धावा केल्या असून ४ गडी गमावले आहेत.


भारतीय संघाला के एल राहुल नंतर तिसरा धक्का बसला आहे. सुर्यकुमार यादव तंबूत परतला, फलंदाज हसनने सुर्यकुमार यादवला ११ धावांवर बाद केले.


भारतीय संघाला दुसरा धक्का, सलामीवीर फलंदाज के एल राहुल बाद

भारतीय संघाला लगातार दुसरा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर खेळाडू केएल राहुल रोहित शर्मानंतर तंबूत परतला आहे. राहुलने ८ चेंडूमध्ये ३ धावा केल्या आहेत.


T20 WC ind vs pak, भारतीय संघाला पहिला धक्का, रोहित शर्मा शून्यावर बाद


भारताकडून सलामीवीर म्हणून केएल राहुलसह रोहित शर्मा मैदानात


भारत पाकिस्तानमध्ये २०० वा सामना होत आहे. टी २० वर्ल्डकपम मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर अझम याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरेल

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.


ड्रग्ज प्रकरणात पंच प्रभाकरने केलेला आरोप गंभीर – जयंत पाटील


…हा तर संपत्ती हडपण्याचा डाव, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीवरून मनसेचा आरोप, निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप


आर्यनला सोडवण्यासाठी २५ कोटींची मागणी केली होती, पंच प्रभाकर साईलचे किरण गोसावीविरोधात आरोप


दुर्गम भागांपर्यंत लसीकरण पोहचवण्यात आले, लसीकरणाचा लोकांचा चांगला प्रतिसाद, लसीकरण अभियान यशस्वी, सरदार पटेलांच्या विचारांपासून खूप शिकू शकतो. – पंतप्रधान मोदी


आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, १० वाजता पेपर असताना अजून पेपर मिळाला नाही, पुण्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळ


उल्हासनगरमधील कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीचा स्लॅब कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर एक तरुण जखमी झाला आहे. आकाश पोपटानी असं मृत तरुणाचे नाव आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या बेडरुमचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -