घरदेश-विदेशCoronavirus: लहान मुलांनी मास्क घालण्याबाबत WHO ची नवीन Guidline

Coronavirus: लहान मुलांनी मास्क घालण्याबाबत WHO ची नवीन Guidline

Subscribe

देशासह जगात वाढत्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मुलांनी मास्क घालण्याच्या मार्गदर्शक सूचना अद्ययावत केल्या आहेत. त्यांनी असे सांगितले आहे की, पाच वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. मास्क घालण्याची मुलाची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा आहेत नव्या मार्गदर्शक सूचना

डब्ल्यूएचओने मुलांच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या एकूण आरोग्याच्या इतर बाबींवर देखील विचार केला आहे. या आधारावर, त्यांनी सल्ला दिला आहे की १२ वर्षाखालील मुलांनी मास्क परिधान करावे आणि त्यांनी प्रौढांप्रमाणेच मार्गदर्शक सूचना देखील पाळाव्यात. विशेषतः अशावेळी कमीतकमी एक मीटरचे अंतर इतरांकडून राखले जात नाही आणि मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार होतो. डब्ल्यूएचओने त्याच्या कोरोना व्हायरस संदर्भात अनेक निकष समाविष्ट केले आहेत. त्याने असे म्हटले आहे की, मुलांमध्ये कोविड -१९ चा प्रसार वेगाने होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी मास्क घालावे.

- Advertisement -

६ ते ११ वर्ष वयोगटातील मुलांसाठी डब्ल्यूएचओने असे सांगितले की, कोरोना व्हायरस संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी त्यांनी मास्क घालावे. या व्यतिरिक्त, प्रौढ लोकांची शक्यता जास्त असलेल्या ठिकाणी देखील ६ ते ११ वर्षाच्या मुलांनी देखील मास्क घालावे. घरातील वृद्ध सदस्यांना डब्ल्यूएचओचा सल्ला आहे की, पालकांनी मुलांच्या मास्क घालण्यावर लक्ष द्यावे आणि ते कसे वापरावे हे देखील त्यांना आवर्जून सांगावे.

WHO ने असेही सांगितले की, अद्याप त्यांच्याकडे लहान मुलं किती प्रमाणात व्हायरस पसरवू शकतात याची माहिती नाही. परंतु काही पुराव्यांच्या आधारे असे म्हणता येईल की लहान मुलांमध्ये प्रौढांप्रमाणेच इतरांनाही संक्रमित करण्याची क्षमता असते.


धक्कादायक! ७ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या सावत्र आई-बापानं घरातच पुरलं!!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -