घरदेश-विदेशलक्षण नसणाऱ्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते: स्टडी

लक्षण नसणाऱ्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते: स्टडी

Subscribe

एका नवीन अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोविड -१९ मधील रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते

एका नवीन अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोविड -१९ मधील रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते, त्यांच्यात कोरोना रोगाची लक्षणे दिसत नाहीत. या अभ्यासानुसार ‘इम्यून पासपोर्ट’ वापरण्याचा धोका वाढला आहे. ‘इम्यून पासपोर्ट’ हा अशा कारणासाठी देण्यात येतो की, एखादा माणूस कोविड -१९ मधून बरा झाला आहे आणि तो प्रवासासाठी किंवा कामासाठी शारिरीकदृष्ट्या उत्तम आहे.

नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात नवीन कोरोना विषाणूने संक्रमित ३७ रुग्णांच्या सार्स-सीओव्ही -२ च्या क्लिनिकल आणि इम्यूनोलॉजिकल अभिव्यक्त्यांचे विश्लेषण केले गेले आहे, ज्यामध्ये कोणतीही कोरोनाचे लक्षणं रुग्णांमध्ये दिसत नाहीत. या रूग्णांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यास १९ दिवस लागले आणि याची तुलना लक्षणे असलेल्या ३७ रूग्णांच्या गटांशी करण्यात आली त्यांच्यात हा कालावधी १४ दिवसांचा होता.

- Advertisement -

चीनच्या चॉन्गक्विंग मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सार्स-सीओव्ही -२ मध्ये संक्रमित बहुतेक रूग्णांना श्वसनाचा त्रास तसेच ताप, खोकला आणि श्वास घेता न येणे यासारख्या लक्षणांमुळे ग्रस्त असतात आणि ही लक्षणे संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतर २ ते १४ दिवसांनंतर दिसतात. तर ते पुढे म्हणाले की, यापैकी काहींमध्ये कोरोना संसर्ग असूनही, अगदी किरकोळ लक्षणे दिसतात किंवा ती मुळीच दिसत नाहीत.

अभ्यासातील संशोधकांनी १० एप्रिल २०२० च्यापूर्वी चीनमधील वानझाउ जिल्ह्यातल्या सार्स-सीओव्ही -२ संक्रमित असणाऱ्या अशा ३७ जणांचा अभ्यास केला ज्यांच्यात कोरोनाचे लक्षणं दिसत नव्हते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, लक्षण नसलेल्या रुग्णांमध्ये २२ महिला आणि १५ पुरूष होते. ज्याचे वय ८ वर्षांपासून ७५ वर्षांदरम्यान होते. त्यांनी अभ्यासामध्ये असे लिहिले, “लक्षणे असलेल्या रूग्णांच्या गटात विषाणूचा कालावधी कमी होता. तर लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत हा कालावधी १९ दिवस होता.”


CoronaVirus: सलून व्यावसायिक आणि ग्राहकामुळे अख्ख शहर हादरले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -