घरदेश-विदेशLockdown: घरी पोहोचण्यासाठी तरूणाची १७०० किमी सायकलवारी!

Lockdown: घरी पोहोचण्यासाठी तरूणाची १७०० किमी सायकलवारी!

Subscribe

लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने त्याने सायकलवरून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनमध्ये मजूर कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने रोज पैसे कमवून दिवसाची भूक भागवणाऱ्या लोकांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे हे मजूर लोक आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत.

१७०० किमीची सायकलवारी!

ओडिशातील जाजपूर येथील रहिवासी असलेला महेश जेना महाराष्ट्रातील सांगलीमध्ये राहत होता. तेथेच तो नोकरी देखील करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने त्याने सायकलवरून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. महेशने सांगली ते ओडिशातील जाजपूर पर्यंत १७०० किमीचा प्रवास १ ते ७ एप्रिल दरम्यान दररोज १४ ते १६ तास सायकलवारी करून पूर्ण केला.

- Advertisement -


LockDown: बापरे! घरी जाण्यासाठी ३ लाख खर्च करून बनला कांद्याचा व्यापारी!

चंदीगडमधील काही मजूर लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी टॅक्सीवाल्यांकडे पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांना गावी नेण्यासाठी प्रति व्यक्ती ४००० रुपयांची मागणी केल्यानंतर मजूरांनी दुचाकी किंवा सायकल घेऊन आपल्या गावी जाण्याचे ठरविले. हे सर्व मजूर उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील सरदारगड गावचे रहिवासी आहेत. त्याचे गाव चंदीगडपासून सुमारे ९६० किलोमीटर अंतरावर आहे.

- Advertisement -

रोजगार नसल्याने गाव गाठण्याचा निर्णय

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे मजुरांच्या नोकर्‍या गेल्याने त्यांच्याकडे गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.यापैकी काही लोकांनी दिल्ली ते बिहार पर्यंत सायकल चालविली. तर काही लोकांनी दिल्ली आणि नोएडावरून बिहारपर्यंतचा मोटारसायकलवरून प्रवास केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -