घरताज्या घडामोडीLive Update: धुळे जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत...

Live Update: धुळे जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत अनिश्चित काळासाठी संचारबंदी

Subscribe

धुणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. धुणे जिल्ह्यात आज २०७ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. धुळ्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर विविध जनजागृतीसाठी मॉल्सना देणार भेटी देणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी रेल्वेमध्ये फिरुन कोरोनाबाबत जनजागृती केली होती. त्याचप्रमाणे पबमालकांसोबत पबमध्ये गर्दी करणाऱ्यांनासुद्धा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

आज राज्यात ८ हजार ९९८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर आज राज्यात एकूण ६ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (सविस्तर वाचा)


मुंबईत आज ११०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५४ कोरोनाबाधित रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा रद्द करण्यात आली आहे. फक्त ५० जणांच्या उपस्थितीत पूजा आणि धार्मिक विधी पार पडणार आहेत. आंगणेवाडीची जत्रा ही केवळ आंगणे कुटुंबियांपूर्ती मर्यादित असणार आहे. तर कुणकेश्वरची यात्रा केवळ पुजारी,मानकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थित पूजा पार पडणार आहे.


वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात झालेल्या आरोपानंतर वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आज राज्यपालांनी मंजूर केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनाम्यावर सही करुन राजीनामा मंजूर केला. वनमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार मुख्यमंत्र्यांकडे राहिल


दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाइन होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं असून त्यानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० दरम्यान होणार आहे. तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे.


छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात संशयास्पद स्थितीत आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे त्यांचे नाव असून ते छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विष प्राशन केले. नोकरीतील ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.


मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च विधी अधिकारी अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी राज्य शासनाच्या विधी अधिकाऱ्यांना भेट नाकारली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आणि माजी महाधिवक्ते विजयसिंह थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अॅटर्नी जनरल यांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणात अनेक कायदेशीर पेच असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अॅटर्नी जनरल यांची वेळ मागितली होती. परंतु, के.के. वेणुगोपाल यांनी या भेटीसाठी नकार दिला आहे.


पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं

उन्हाळा सुरू झाला असून अनेक शहरांत, राज्यात पाणी कपातीचं संकट कायम असतं, मात्र पुणेकरांची या सकंटातून सुटका झाली आहे. यंदा पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसानं पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा २ टीएमसी पाणी वाढलं असून वरसगाव, पानशेत, आणि टेमघर या धरणांत २९ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात केली जाणार नाही, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.


दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला.


जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


देशात कोरोनाबाधितांचा आकडा अद्याप वाढताच आहे. काल बुधवारी देशात एका दिवसात ७ लाख ७५ हजार ६३१ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती ICMR ने दिली.


भारत विरूद्ध इंग्लंड चौथी कसोटी मालिका, टॉस जिंकून इंग्लंडचा बँटिंगचा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. दरम्यान इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय.


देशासह राज्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. बुधवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी ९ हजार ८५५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. तर राज्यात कोरोनाचे एकूण २१ लाख ७९ हजार १८५ रुग्ण असून बुधवारी राज्यात कोरोनामुळे ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.


जगात ११ कोटी ५७ लाख ६३ हजारांहून अधिक कोरोना बाधितांचा आकडा पार झालाय. तर जगात आता पर्यंत २५ लाख ७१ हजार ६९३ जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. दिलासादायक बाब म्हणजे ९ कोटी १४ लाख ६५ हजार ८५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रकचालकाचा मृत्यू

पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने धडक दिली. खालापूरजवळ झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा अपघात घडला. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी ट्रक उभा होता. या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातात पुढच्या ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला, तर मागील ट्रकमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -