घरदेश-विदेशअल्पवयीन मुलानं मर्सिडीज ठोकली, CRPF जवानाचा मृत्यू

अल्पवयीन मुलानं मर्सिडीज ठोकली, CRPF जवानाचा मृत्यू

Subscribe

मर्सिडीज बेन्झच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये एक सीआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना नोएडामध्ये घडली आहे.

एखाद्या गर्भश्रीमंत बापाच्या मुलानं हातात महागडी गाडी घेऊन रस्त्यावरून सुसाट जावं आणि त्यात अपघात होऊन कुणाचा जीव जावा हे दृश्य सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहातो. पण राजधानी दिल्लीच्या जवळच असणाऱ्या नोएडामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये सीआरपीएफचा एक जवान दुर्दैवीरीत्या मृत्यूमुखी पडला आहे. या प्रकारामुळे राजधानी दिल्लीत मोठा गहजब उडाला असून सानिध्य गर्ग नावाच्या या अल्पवयीन चालक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

नक्की घडलं काय?

गुरुवारी मध्यरात्री नोएडाच्या ग्रेटर कैलाश परिसरातून एक मर्सिडिज तुफान वेगाने सिग्नल तोडून पुढे गेली. सानिध्य गर्ग ही मर्सिडिज चालवत होता. सिग्नल तोडून ही मर्सिडीज समोर उभ्या असलेल्या CRPFच्या गाडीवर जाऊन त्याच वेगात आदळली. पुढे जाऊन ही मर्सिडीज डिव्हायडरवर चढली आणि पुढे विजेच्या पोलवर धडकून थांबली. सानिध्य एकटाच या गाडीत होता. दरम्यान, CRPFच्या गाडीमधघ्ये ३६ वर्षीय विनोद कुमार, ३८ वर्षीय बाबूलाल यादव आणि २४ वर्षी नरेंद्र हे तिघे जवान होते. हे तिघेही या अपघातात जबर जखमी झाले. यामध्ये २४ वर्षीय नरेंद्र गंभीर जखमी झाले होते. त्यात रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. तर इतर दोघांना झालेल्या जखमांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – नोएडा येथे IPS अधिकाऱ्याच्या घरातून ड्रग्ज साठा जप्त

सानिध्यला अटक

दरम्यान, या भीषण अपघाताचा धक्का मोठा असला, तरी सानिध्य मर्सिडिज बेन्झ या कारमध्ये होता. अशा अपघातप्रसंगी कारमध्ये एअर बॅगची व्यवस्था असते. या एअर बॅग्ज बाहेर आल्यामुळे सानिध्यला दुखापत झाली नाही. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. मात्र, सानिध्य दारूच्या नशेत नसल्याचं त्यातून निष्पन्न झालं. सानिध्य लंडनमध्ये त्याच्या पदवीचं शिक्षण घेत असून नोएडामध्ये सुट्टीसाठी आला होता. त्याचे वडील नोएडामध्ये लोखंडाचा मोठा व्यवसाय करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -