घरदेश-विदेशLive Updates Fani Cyclone : 'फनी' चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकले

Live Updates Fani Cyclone : ‘फनी’ चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकले

Subscribe

बंगालच्या उपसागरातील  'फनी' चक्रीवादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने सरत असून येत्या ४८ तासात हे फनी चक्रीवादळ ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘फनी‘ चक्रीवादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने सरत असून येत्या ४८ तासात हे फनी चक्रीवादळ ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. हे वादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकणार असून या वादळाचा वेग सायंकाळच्या सुमारे ताशी १७० ते १८० किमी वेगाने हे वादळ धडकणार आहे. या वादळाचा वेग ताशी २०० किमीपर्यंतही जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या ओडिशातील एकूण १३ जिल्ह्यांमधील सुमारे साडेअकरा लाख नागरिकांना फनीचा धोका असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘फनी’च्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात त्यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दुसरीकडे नागरी हवाई उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व संबंधित विमानतळ प्राधिकरणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

एनडीआरएफची ४०० पथके तैनात

फनीच्या तडाख्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कृती दलाची (एनडीआरएफ) ४०० पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत जवळपास ५० पथक यापूर्वीच सज्ज करण्यात आली आहेत. तर अन्य ३५० पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये चार हजारहून अधिक विशेष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले.

- Advertisement -

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

आज ओडिशामध्ये फनी वादळ धडकणार असल्याची माहिती मिळताच शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आली आहे.

भूवनेश्वर एअरपोर्ट बंद

फनी चक्रीवादळामुळे भुवनेश्वर एअरपोर्टवर येणारी आणि जाणारी विमान सेवा आज रद्द करण्यात आली आहेत. डीजीसीए यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे आज रात्री साडेनऊ ते ४ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत कोलकाता एअरपोर्टवरील विमानसेवा बंद करण्आयात आली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानाची उड्डाण रद्द करण्यात आली असल्याची माहिती डीजीसीए यांनी दिली आहे. पुढील आदेश दिल्यानंतरच विमान सेवा सुरु केली जाणार आहे. पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे.

२२३ गाड्या रद्द

फनीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत सुमारे २२३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द किंवा अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांनी निर्धारित वेळेनंतर तीन दिवसांत पैशाची मागणी केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने बुधवारी ८१ गाड्या रद्द केल्या होत्या आणि आज २२३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -