सावधान! कोरोना लस विक्रीवरून फसवणुकीला सुरूवात

Serum Institute of India starts manufacturing Codagenix's nasal COVID-19 vaccine

कोरोनाच्या संकटकाळातही सायबर क्राइमच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सायबर क्राइम आधी मोफत कोविड चाचणी करणे आणि बीपी, ऑक्सिजन तपासणी करणे यासाठी मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याच्या निमित्ताने युजर्सची फसवणूक करत होते. आता ते कोरोना लस विकण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत. सायबर फसवणुकीचा सर्वात मोठा अड्डा डार्क वेबवर सध्या कोरोना लस विक्रीसाठी असण्याचा दावा करण्यात आला आहे. सायबर क्राइम डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध असणारी ही कथित कोरोना लस क्रिप्टोकरंसीच्या रुपात पैसे घेऊन दिली जात आहे. डार्क वेबवर कोरोना लस विकणाऱ्यांचा दावा आहे की, चीनने कोरोना लस बनवली असून ती इतर देशांना देत नाहीत. इतकेच नव्हे तर चीनच्या वुहान व्हायरोलॉजी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ याबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत. मात्र आम्ही कितीतरी देशांमध्ये या लसीची विक्री केली आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली लस होम डिलिव्हरी देण्याचा दावा करते. यासाठी ते केवळ क्रिप्टोकरंसी बिटकॉईननेच पैसे घेतात. जो कोणी त्यांच्या या फसवणुकीला बळी पडतो तो पैसे गमावतो. त्यामुळे ग्राहकांनी अशा ऑनलाईन साईट्सवर डोळेझाकपणे खरेदी करू नये, कारण बिटकॉईनला सायबर तज्ज्ञदेखील ट्रेस करून शकत नाहीत. त्यामुळे जर कोणाची फसवणूक होत असेल तर त्याचा तपासदेखील होणे कठिण आहे.

हेही वाचा –

फक्त जीवच नाही तर Corona अनेकांच्या नोकऱ्यादेखील हिसकावतोय; जगात ५० कोटी लोकं बेरोजगार