घरदेश-विदेशसंरक्षण दलाकडून चीनच्या ५४ अ‍ॅप्सपासून सैन्याला सावध राहण्याचे आदेश

संरक्षण दलाकडून चीनच्या ५४ अ‍ॅप्सपासून सैन्याला सावध राहण्याचे आदेश

Subscribe

लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चीन आता भारतात मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्याची योजना आखत आहे. चीनने यासाठी बनवलेली योजना केवळ सुरक्षा दलांवरच नाही, तर सर्वसामान्यांनासाठीही आहे. केंद्र आणि राज्य सरकारची मंत्रालये, छोटे-मोठे व्यवसाय आणि इतर हजारो संघटना चीनच्या या षडयंत्रात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दल लागलीच सतर्क झाले असून चीनच्या एकून ५४ अ‍ॅप्सपासून लांबच रहा, असे आदेश संरक्षण दलाचे जवानांना दिले आहेत.

लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चीन आता भारतात मोठ्या प्रमाणात सायबर हल्ल्याची योजना आखत आहे. चीनने यासाठी बनवलेली योजना केवळ सुरक्षा दलांवरच नाही, तर सर्वसामान्यांनासाठीही आहे. केंद्र आणि राज्य सरकारची मंत्रालये, छोटे-मोठे व्यवसाय आणि इतर हजारो संघटना चीनच्या या षडयंत्रात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण दल लागलीच सतर्क झाले असून चीनच्या एकून ५४ अ‍ॅप्सपासून लांबच रहा, असे आदेश संरक्षण दलाचे जवानांना दिले आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्व विभाग आणि सुरक्षा दलांना चीन आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या 54 अ‍ॅप्सबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

भारत आणि चीन यांच्या सीमेवर वाद निर्माण झाल्यानंतर चीन कुठल्याही मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. जास्तीत जास्त कंपन्या, संस्था, सरकारी कार्यालये आणि सुरक्षा दल इत्यादींमधील माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घुसखोरी करून ती चोरण्याचा चीनचा मनसुबा आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या कारवाईपासून सतर्क राहण्याकरिता केंद्राव्यतिरिक्त सुरक्षा संस्था, सैन्य, निमलष्करी दले आणि पोलिस संघटना यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. चीनमधील सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. गेल्या एका महिन्यादरम्यान देशभरात साडेसात लाखाहून अधिक सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनी हॅकर्स भारतीयांच्या बँक खात्याशी संबंधित माहिती त्यांच्या विविध मोबाइल अ‍ॅप्स आणि ईमेलद्वारे प्राप्त करीत आहेत. क्रेडिट कार्ड पेमेंटवर लक्ष ठेवणे आणि बनावट ईमेल पत्त्याद्वारे एखाद्या व्यक्तीची इतर माहिती गोळा करणे हे त्याच्या अजेंड्यावर आहे.

- Advertisement -

५४ अ‍ॅप्स डिलीट करा
सुरक्षा दलांना हे 54 मोबाइल अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले गेले आहे. त्यापैकी बहुतेक चीन किंवा त्याच्या सहाय्यक कंपन्या तयार केल्या आहेत. कंपनी भिन्न असू शकते, परंतु त्याचे नियंत्रण चीनमध्ये कायम आहे. जर एखाद्या अज्ञात स्रोताकडून ईमेल आला असेल तर तो उघडू नका. एसएमएस किंवा ईमेलमध्ये एखादे संलग्नक असल्यास ते मुळीच उघडू नका. असे बरेच ईमेल आहेत जिथे फक्त एक किंवा दोन अक्षरांचा फरक आहे. ईमेल उघडण्यापूर्वी त्याचा पत्ता काळजीपूर्वक तपासा. फोन कॉल किंवा ईमेलद्वारे आपली आर्थिक माहिती कोणालाही देऊ नका. कोविड -१९चाचणी, लॉटरी, कोठे बक्षीस मिळेल, कॅशबॅक ऑफर आणि एखाद्या सेलिब्रिटीसमवेत तुमची भेट घेण्याविषयी माहिती असल्यास अशा प्रकारचे कोणतेही ईमेल, ऑफर, संदेश आला असल्यास प्रथम तो तपासा. याची URL खात्री करुन पहा. अशा प्रकारची सायबर घुसखोरी रोखण्यासाठी मोबाईल आणि संगणकात मजबूत अँटी व्हायरस सिस्टम स्थापित करा, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -