घरताज्या घडामोडीकेजरीवाल सरकार तब्बल 70 लाख बाटल्यांतील दारू फेकणार; वाचा नेमके कारण काय?

केजरीवाल सरकार तब्बल 70 लाख बाटल्यांतील दारू फेकणार; वाचा नेमके कारण काय?

Subscribe

दारूच्या बाटलीतील एक थेंब जरी खाली सांडला तर, मद्यप्रेमींना त्याचे दु:ख होते. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार तब्बल 70 लाख दारुच्या बाटलीमधील दारू ओतुन टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दारूच्या बाटलीतील एक थेंब जरी खाली सांडला तर, मद्यप्रेमींना त्याचे दु:ख होते. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार तब्बल 70 लाख दारुच्या बाटलीमधील दारू ओतुन टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीत 1 सप्टेंबरपासून जुनेच मद्य धोरण लागू केल्यामुळे दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाकडे 70 लाख दारूच्या बाटल्या पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अबकारी विभागाकडून सध्याच्या धोरणानुसार या बाटल्यांची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचा विचार केला जात आहे. (delhi excise dept exploring options to dispose 70 lakh unsold liquor bottles)

1 सप्टेंबरपासून दिल्लीत प्रशासनाकडून जुने दारू धोरण लागू केल्यामुळे दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाकडे 70 लाख दारूच्या बाटल्या शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अबकारी विभागाकडून या बाटल्यांची विल्हेवाट किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मद्य धोरण बदलल्यामुळे बाटल्यांची नोंदणी करणे आणि दारू विक्रेत्यांमार्फत विक्री करणे हा पर्याय बाटल्यांच्या नोंदणीनंतर होतो. मात्र आता 70 लाख दारुच्या बाटल्यांची नोंदणी झाली नसल्यामुळे त्या बाटल्यांचा करायचा काय असा प्रश्न निर्माण झाला.

दरम्यान, अबकारी खात्याकडे या 70 लाख दारुच्या बाटल्या पडून असल्या तरी केजरीवाल सरकारच्या 2021-22 च्या वादग्रस्त मद्य धोरणामुळे त्यांची विक्री करता येणार नाही. तसेच, अबकारी खात्याकडे पडून असलेल्या दारूच्या बाटल्यांमध्ये काही बाटल्या या वाईन आणि बिअरच्या असल्याचे समजते.

- Advertisement -

दिल्लीतील आप सरकारच्या दारू घोटाळ्यावरुन प्रचंड वादंग माजले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच त्यातील वेगवेगळे मुद्दे आता समोर येई लागेल आहेत.


हेही वाचा – ठाकरे गटाला लागलेली गळती थांबेना; 8 राज्यांतील शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे शिंदेंना समर्थन?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -