घरदेश-विदेशCorona: मुंबईपाठोपाठ बिहार, दिल्लीतही पत्रकारांवर कोरोनाचं सावट!

Corona: मुंबईपाठोपाठ बिहार, दिल्लीतही पत्रकारांवर कोरोनाचं सावट!

Subscribe

मुंबई पाठोपाठ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केजरीवाल यांच्यानंतर बिहारमध्येही विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पत्रकारांसाठी केली मागणी

कोरोना व्हायरसचा संगर्ग डॉक्टर, पोलीस, बेस्ट कर्मचाऱ्यांपाठोपाठ शहरात ठिकठिकाणी, रुग्णालयांत, वस्त्यांमध्ये, कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेंन्मेंट झोनमध्ये वार्तांकनासाठी फिरणाऱ्या ५३ वार्ताहर आणि वृत्तछायाचित्रकारांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या मुंबईतील पत्रकारांना कोरोना लागण झागल्यानंतर मुंबईपाठोपाठ बिहार, दिल्लीतही पत्रकारांवर कोरोनाचं सावट असल्याने विविध राज्यांमध्ये काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीतर्फे माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार मुंबईत ठिकठिकाणी जाऊन ‘ऑन फिल्ड रिपोर्टिंग’ करतात. ही बाब लक्षात घेऊन पत्रकारांची कोरोना चाचणी घेण्यात आली. मुंबई मनपाच्यावतीने या चाचणीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली होती. एकूण १६७ जणांची कोरोना चाचणी झाली. यात ५३ पत्रकारांममध्ये ‘लो रिस्क कोविड१९’चा प्रार्दुभाव झाल्याचे उघड झाले. दरम्यान, १६ आणि १७ एप्रिल या दिवसांमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात कोरोनाच्या चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. ज्यानंतर पत्रकारांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची बाब उघड झाली होती.

- Advertisement -

बिहार, दिल्लीतही पत्रकारांवर कोरोनाचं सावट

मुंबई पाठोपाठ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर बिहारमध्येही विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पत्रकारांसाठीच्या कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी ट्विट करून केली आहे.

कोरोनाची कानाकोपऱ्यातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांच्या आरोग्यासाठीही आता सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत.


दिलासादायक! देशात एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनामुक्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -