घरदेश-विदेशदिलासादायक! देशात एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक! देशात एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

गेल्या काही दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढत आहे

देशभरात कोरोना व्हायरस आपले हात-पाय पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रूग्णांची संख्या १८ हजाराच्या पुढे गेली असून सध्या ही संख्या १८ हजार ६०१ झाली आहे. तर ५९० लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी देखील आहे की, कोरोना बाधित रूग्ण उपचारांना प्रतिसाद देत असल्याने लवकरात लवकर बरे होत आहेत. आतापर्यंत देशातील ३ हजार २५२ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. फक्त सोमवारी एका दिवसात ७०५ रूग्ण बरे झाले असून एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची ही संख्या सर्वाधिक आहे.

- Advertisement -

एका दिवसात ७०५ रुग्ण कोरोनामुक्त

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. भारताच्या कोरोना व्हायरसविरूद्धच्या युद्धामधील हे शुभ संकेतच आहे. गेल्या काही दिवसांची कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी पाहिल्यास १५ एप्रिल रोजी १८३ लोक बरे झाले आहेत. दुसर्‍या दिवशी म्हणजेच १६ एप्रिल रोजी ही संख्या वाढून २६० झाली. १७ एप्रिल रोजी २४३ रूग्ण कोरोनामुक्त झाले तर १८ एप्रिल रोजी २३९ रूग्ण कोरोनामुक्त करण्यात आले. तसेच १९ एप्रिल रोजी ३१६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून २० एप्रिल रोजी तब्बल ७०५ लोकांना कोरोना व्हायरसपासून मुक्त केले गेले.

- Advertisement -

राज्यातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या

राज्यांनुसार सांगायचे झाले तर सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात ५७२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ही संख्या ४३१ आहे. केरळमधील ४०८ रुग्णांपैकी २९१ रूग्ण आता बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत बिहारमधील एकूण ११३ रूग्णांपैकी ४२ रुग्ण बरे झाले असून यूपीतील १ हजार १८४ रूग्णांपैकी १४० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये ४५७, राजस्थानमध्ये २०५, तेलंगणात १९०, मध्य प्रदेशात १२७, गुजरातमध्ये १३१ आणि हरियाणामध्ये १२७ कोरोना रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -