Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिल्लीतील सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या हृदयात बनावट स्टेंट, २६५ जणांचा मृत्यू

दिल्लीतील सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या हृदयात बनावट स्टेंट, २६५ जणांचा मृत्यू

Subscribe

येथेील राजीव गांधी रुग्णालयात २६५ रुग्णांचा बनावट स्टेंट बसवल्याने मृत्यू झाला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत महाभयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. येथेील राजीव गांधी रुग्णालयात २६५ रुग्णांचा बनावट स्टेंट बसवल्याने मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्लीतील राजकारण पेटले असून भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी यासाठी केजरीवाल सरकारला लक्ष्य केलं आहे. गुप्ता यांनी केजरीवाल सरकारच्या रुग्णालयांना सुविधा देण्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उभारले आहे.

याप्रकरणी गुप्ता यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिलेल्या दाव्यांवर प्रश्न उभारला आहे. २५६ रुग्णांच्या मृत्यूला केजरीवाल सरकार जबाबदार असल्याचे गु्प्ता यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील ३७९३ रुग्णांपैकी १५४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यावर केजरीवाल सरकार गप्प का असा सवाल केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेच्या पोकळ मॉडेलचा वापर करत आहेत. तसेच ते गुजरातेत जाऊन त्यांच्या वर्ल्ड क्लास आरोग्य व्यवस्थेबदद्ल दावे करतात. पण त्यांच सत्य आता बाहेर आलंय. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्या शरीरात बनावट स्टेंट बसवण्यात आल्याचे गुप्ता यांनी आरटीआयच्या बातमीतून समोर आल्याचे सांगितले. त्याचबरोबर दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये स्टेंटचा जे व्यक्ती पुरवठा करतात ते केजरीवाल यांच्या अत्यंत जवळचे सत्येंद्र जैन यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या बनावट स्टेंटने अनेकांचा जीव घेतला आहे. अशा व्यक्तीला केजरीवाल यांनी आश्रय दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी दिल्ली भाजपने केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -