घरताज्या घडामोडीDelhi-NCR Rain: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस; पुढील 3 दिवस गारपिटीचा इशारा

Delhi-NCR Rain: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस; पुढील 3 दिवस गारपिटीचा इशारा

Subscribe

दिल्ली एनसीआरमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही सुरूच होता. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होता. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला.

दिल्ली एनसीआरमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही सुरूच होता. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होता. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला. मात्र आता 5 मे पर्यंत पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. (Delhi NCR Rain Mausam Ki Jankari Rain Started In Delhi NCR Weather Update)

दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी झालेल्या पावसाने कमाल तापमानात सामान्यपेक्षा 10 अंशांनी घट केली, तर किमान तापमानातही एक अंशाने घट झाली. पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज असून त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, 4 मे नंतर सूर्यप्रकाशामुळे वातावरण स्वच्छ होईल आणि तापमानात वाढ होईल.

- Advertisement -

हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 मेपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. या कारणास्तव, 1 मे ते 3 मे या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारताच्या मैदानी भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, राजधानीत रविवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 0.3 मिमी पाऊस झाला. मयूर विहार परिसरात सर्वाधिक 10 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे कमाल तापमान 28.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा 10 अंशांनी कमी आणि किमान तापमान 22.8 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा एक अंश कमी होते. तर गुरुग्राममध्ये 10.5 मिमी, फरिदाबादमध्ये सकाळी 8.30 वाजेपर्यंत 3 मिमी आणि नोएडामध्ये संध्याकाळपर्यंत 4.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे मयूर विहार परिसर सर्वात थंड राहिला. येथे कमाल तापमान 28.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

- Advertisement -

सोमवारीही दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून ताशी ३५ किमी वेगाने वारेही वाहू शकतात, त्यामुळे तापमानात आणखी काही घसरण होईल. ३ मे पर्यंत वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास पर्यंत वाढू शकतो. कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


हेही वाचा – प्रियांका गरजल्या – मोदींनी माझ्या भावाकडून शिकावं, राहुल म्हणतात ‘मी देशासाठी शिव्याच नाही तर गोळ्याही झेलायला तयार’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -