घरताज्या घडामोडीमुंबईत २१६ धोकादायक इमारतींचे पालिकेसमोर आव्हान

मुंबईत २१६ धोकादायक इमारतींचे पालिकेसमोर आव्हान

Subscribe

मुंबईत सध्या २१६ इमारती या धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी ९७ इमारती या अतिधोकादायक आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये शेकडो लोक राहत आहेत. यंदाच्या पावसाळयात जर इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबई : मुंबईत सध्या २१६ इमारती या धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकी ९७ इमारती या अतिधोकादायक आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये शेकडो लोक राहत आहेत. यंदाच्या पावसाळयात जर इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सदर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून सदर इमारती खाली करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

मुंबईत पाच वर्षांपूर्वी धोकादायक, अतिधोकादायक स्थितीमधील इमारतींची संख्या ६१९ पर्यंत नोंदविण्यात आली होती. मात्र त्यापैकी अनेक इमारती खाली करण्यात आल्या. काही इमारतींचा पुनर्विकास करण्यात आला. तर काही इमारतींची पडझड झाली. त्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी झाली. परिणामी मुंबईतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संख्या कमी होऊन २१६ पर्यंत घसरली आहे.

- Advertisement -

मात्र या २१६ पैकीही ९७ इमारती या अतिधोकादायक आहेत. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यामुळे अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारती खाली करण्यास सांगितले असता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यास ते इमारत खाली करीत नाहीत. अनेक इमारतींमध्ये मालक व रहिवाशी यांच्यातील तिढा विकोपाला जाऊन न्यायालयात गेला आहे.

त्यामुळे सदर इमारती रिकाम्या करणे पालिकेला अडचणीचे ठरते. तर मालक व रहिवाशी यांच्यात तिढा असल्याने अशा इमारतींचा पुनर्विकास करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे अशा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो रहिवाशांचा जीव टांगणीला लागलेला आहे. पालिका दरवर्षी धोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करण्याबाबत रहिवाशांना नोटिसा बजावत असते.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi-NCR Rain: दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस; पुढील 3 दिवस गारपिटीचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -