घरदेश-विदेशप्रियांका गरजल्या - मोदींनी माझ्या भावाकडून शिकावं, राहुल म्हणतात 'मी देशासाठी शिव्याच...

प्रियांका गरजल्या – मोदींनी माझ्या भावाकडून शिकावं, राहुल म्हणतात ‘मी देशासाठी शिव्याच नाही तर गोळ्याही झेलायला तयार’

Subscribe

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आह. सार्वजनिक जीवनात हार-तुऱ्यांसोबत टीकाही सहन करण्याची हिंमत ठेवली पाहिजे, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप विरोधात काँग्रेसचे अनेक नेते मैदानात उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधीही कर्नाटकात ठिकठिकाणी सभा आणि रोड शो करत आहेत.

कर्नाटकमधील जमखंडी येथील सभेत प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ‘जनतेसमोर येऊन आपलं दुःख सांगून रडणारा पहिला पंतप्रधान मी पाहिला आहे. मोदी म्हणतात की मला शिव्या दिल्या जात आहेत. मोदींकडे जनतेच्या समस्यांची लिस्ट नाही, तर शिव्यांची लिस्ट आहे. मोदींनी माझ्या भावाकडून – राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) काही तरी शिकावं. ते (राहुल गांधी) म्हणतात, शिव्याच काय देशासाठी मी छातीवर गोळ्या झेलायलाही तयार आहे.’

- Advertisement -

पंतप्रधान मोदींची शनिवारी बिदरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे लोक मला शिव्या देत असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी सांगितले, की त्यांना ९१ वेळा शिव्या देण्यात आल्या आहेत. यावरुनच रविवारी प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान जनतेसमोर येऊन रडत असल्याचा टोला लगावला.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी म्हणाल्या, मी माझ्या आयुष्यात असे पहिले पंतप्रधान पाहिले आहे, जे जनतेसमोर येऊन रडत आहेत, की मला शिव्या दिल्या जात आहे. या पंतप्रधानांकडे जनतेच्या समस्यांची कोणतीही यादी नाही. पंतप्रधान कार्यालयात बसून एक यादी तयार करण्यात आली आहे, की त्यांना कोणी किती शिव्या दिल्या आहेत. ही तुमच्या (जनतेच्या) समस्यांची यादी नाही. शेतकऱ्यांना काय त्रास होतो याची त्यांच्याकडे यादी नाही.

- Advertisement -

प्रियांका गांधी म्हणाल्या, यांना दिल्या जाणाऱ्या शिव्या या एकाच कागदावर मावल्या आहेत. आमच्या परिवाराला भाजप आणि त्यांच्या पुरस्कृत संघटना काय-काय शिव्या देतात याची लिस्ट आम्ही करत बसलो तर पुस्तकांवर पुस्तके छापले जातील. मात्र आम्ही त्याची पर्वा करत नाही.

प्रियांका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही ट्विट केला आहे. त्यासोबत लिहिले आहे,
सुन सायबा.. सुन…
हिम्मत हैं तो सुन…
जनता ने तो सुन लिया..
तू भी एकबार सुन..

पंतप्रधानांनी थोडी तरी हिंमत दाखवली पाहिजे, माझ्या भावाकडून पंतप्रधानांनी काही शिकलं पाहिजे, असा टोला लगावत प्रियांका गांधी म्हणाल्या. ‘माझा भाऊ म्हणतो, शिव्याच काय, या देशासाठी मी गोळ्याही खायला तयार आहे. माझा भाऊ म्हणतो की, कोणत्याही परिस्थितीत मी सत्याच्या बाजूने उभा राहिल. तुम्ही शिव्या द्या, गोळ्या मारा किंवा चाकू-सुरे चालवा.’

प्रियांका गांधींनी मोदींना सार्वजनिक जीवनात फुल हारांसोबत टीकाही सहन करावी लागते आणि पुढे जावं लागतं याचा धडा देत थोडी तरी हिंमत दाखवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, मोदीजी घाबरू नका, हे सार्वजनिक जीवन आहे. यात हे सगळं सहन करावं लागतं. आणि पुढे जावं लागतं.

हेही वाचा : ‘काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा मला शिवीगाळ केली; त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांनाही सोडले नव्हते’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -