घरअर्थजगतdigital payments : डिजिटल पेमेंटवरील बँकांची वसुली होणार कमी, आरबीआयने दिले मोठे...

digital payments : डिजिटल पेमेंटवरील बँकांची वसुली होणार कमी, आरबीआयने दिले मोठे संकेत

Subscribe

भारतात सध्या डिजिटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होतोय. यात कोणतेही व्यवहार करण्यासाठी आपण विविध बँकिंग अॅप, पेटीएम, पे-फोन अशा अनेक ऑनलाईन पेमेंट अॅपचा वापर करतो. मात्र या पेमेंटवर बँकांकडून मोठ्याप्रमाणात शुल्क वसूल केले जाते. मात्र बँकांची ही वसुली आत्ता कमी होणार आहे. असे संकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत ग्राहकांना डिजिटल पेमेंट शुल्कातून दिलासा मिळू शकतो.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, सर्व भागधारकांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे अलिकडच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली. मात्र डिजिटल पेमेंटसाठी आकारले जाणारे शुल्क योग्य आहे की नाही याबाबतची चिंता अद्याप कायम आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पुढे म्हणाले की, ग्राहकांकडून डिजिटल पेमेंटवर घेतले जाणारे शुल्काचे फायदे, तोटे दोन्ही असू शकतात. परंतु हे शुल्क सर्वाना परवडेल असे पाहिजे. हे शुल्क असे असून नये ज्यामुळे डिजिटल पेमेंटमध्ये अडथळ येईल. या विषयावर लवकरच चर्चापत्र काढणार आहे. यामध्ये डिजिटल पेमेंटच्या विविध पद्धतींच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.

सध्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, प्रीपेड पेमेंट माध्यम(कार्ड आणि वॉलेट) , युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंटवर शुल्क भरावे लागतेय.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -