घरदेश-विदेशअर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा, पण…

अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा, पण…

Subscribe

मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच मी शिवसेनेतच राहणार असे म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी आता एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर अर्जून खोतकर यांनी खुलासा केला आहे.

अर्जून खोतकर काय म्हणाले –

- Advertisement -

आज दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्जून खोतकर यांनी भेट घेतली. या भेटी बाबत खोतकर यांनी भेट झाली तर चर्चा होते. मात्र, याचा वेगळा अर्थ काढूनये. भेट झाली याचा आर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेमध्ये आहे, असे खोतकर यांनी म्हटले आहे.

कोण आहेत अर्जून खोतकर –

- Advertisement -

मराठवाड्यातील जालना विधानसभा मतदार संघाचे प्रभावी नेते अशी अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. 1990 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर ते चारवेळा आमदार झाले. 2014 मध्ये ते चौथ्यांदा आमदार होऊन पशुलंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. 1999 पासून काँग्रेसचे प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात चुरशीची लढत होते. 2014 मध्ये अर्जुन खोतकर केवळ 296 मतांनी विजयी झाले होते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीअंतर्गत निवडणूक लढवली गेल्याने खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात तणाव होता. अखेर ही जागा भाजपला देण्यात आली. त्यावेळी खोतकरांनी माघार घेतली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -