घरताज्या घडामोडीआम्हाला मध्य आशियाच्या इंधनाची गरज नाही; ट्रम्प यांचा इराणला इशारा

आम्हाला मध्य आशियाच्या इंधनाची गरज नाही; ट्रम्प यांचा इराणला इशारा

Subscribe

इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानीचा खात्मा केल्यानंतर आज पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. सुलेमानी हा क्रूरकर्मा होता म्हणूनच आम्ही त्याला मारले. तसेच इराणने केलेल्या हल्यात एकही अमेरिकन सैनिक जखमी झाला नाही. तसेच आमच्या लष्करी तळाचेही फार नुकसान झाले नसल्याचे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. ट्रम्प पुढे म्हणाले की, “आम्ही अनेक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार केले आहेत. खरंतर आमच्याकडे सर्वात अद्ययावत तंत्रज्ञानासहीत लष्कर तयार आहे. याचा अर्थ लष्काराचा वापर केलाच पाहीजे असे नाही. मात्र लष्कराचा वापर करण्याची वेळ येऊ नये, असे आम्हाला वाटते.”

- Advertisement -

इराण जोपर्यंत दहशतवादाला पुर्णविराम देत नाही, तोपर्यंत मध्य आशियात शांतता नांदणार नाही. तसेच आम्हाला मध्य आशियातील इंधनाची गरज नाही, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -