घरदेश-विदेशहिंदू संघटनांनी केले प्रसार माध्यमांना आवाहन

हिंदू संघटनांनी केले प्रसार माध्यमांना आवाहन

Subscribe

शबरीमला मंदिराचा प्रश्नाबाबत वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवू नका असे आवाहन प्रसार माध्यमांना हिंदू संघटनांकडून करण्यात आले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि इतर सुरक्षा व्यवस्था अजूनही 'हाय अलर्ट'.

केरळमध्ये प्रसिद्ध शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर अजूनही असंतोष असल्याचे चित्र आहे. मंदिरात प्रवेश करण्यावर न्यायालयाने महिलांच्या बाजूने दिलेल्या निर्णयावरुन मंदिर प्रशासन आणि हिंदू सघंटना नाराज आहेत. शबरीमला मंदिराच्या प्रश्नांचे वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवू नका असे आवाहन हिंदू संघटनांनी केले आहे. या बाबतीत संघटनांकडून प्रसार माध्यमांना पत्र लिहिण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू ऐक्यवेदी संघटनेद्वारे शबरीमला कर्म समितीला निवेदन देण्यात आले आहे. सोमवारी विशेष पूजेसाठी अयप्पा मंदिर उघडण्यात येणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अयप्पा मंदिरात १० ते ५० वर्षांपर्यंतच्या महिलांना प्रवेश मंजूर करण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला होता. या निर्णयाचा विरोध संघटनांकडून करण्यात येत आहे.

महिला पत्रकांराचा विरोध

मागील महिन्यात शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश करण्यावरुन केरळ मधील वातावरण तापले होते. मागील महिन्यात शबरीमला मंदिराच्या परिसरात वार्तांकण करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. महिला पत्रकार असल्यामुळे मंदिरात वार्तांकन करण्यासाठी प्रसार माध्यमांना प्रवेश दिला जात नव्हता. अखेर या महिला पत्रकाराला माघार घ्यावा लागला.

- Advertisement -

पत्रातून केले आवाहन

“शबरीमला मंदिरातील वाद सुरु असताना स्थिती बिघडेल असे कोणत्याही प्रकाराचे काम तुम्ही करणार नाहीत. त्रावणकोर चे राजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा चा मंगळवारी वाढदिवस आहे. या निमित्ताने सोमवारी पूजेसाठी मंदिर उघडले जाणार आहे. याच बरोबर मंगळवारी रात्री बंद करण्यात येईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -