घरदेश-विदेशइंडोनेशियात भूकंपाचा तीव्र हादरा; ४६जणांचा मृत्यू, ७०० जण जखमी

इंडोनेशियात भूकंपाचा तीव्र हादरा; ४६जणांचा मृत्यू, ७०० जण जखमी

Subscribe

जकार्ता – इंडोनेशियात सोमवारी भूकंपाचे हादरे बसले. हा भूकंप इतका जोरदार होता की तब्बल ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचंही प्रशासनाने सांगितलं आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी दिशेला असलेल्या सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होतं.5.6 रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे. हा भूकंप इतका भीषण होता की यामुळे शहरातील इमारती हलल्या. यामुळे इमारतींचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. तर, यामुळेच ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या भूकंपात अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचं नुकसान झालं आहे. सियांजूरमध्ये काही इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरू आहे.


शुक्रवारीही जकार्ता येथे भूकंप झाला होता. या भूकंपाचेही मोठे हादरे बसले. त्यामुळे काही लोकांनी घराबाहेर धाव घेतली होती. यावेळी 6.6 रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली होती. या भूकंपाची खोली 20 किमीपर्यंत होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -