घरताज्या घडामोडीड्रायव्हरच्या मस्तीमुळेच नवले ब्रिजवर भीषण अपघात, चौकशीनंतर धक्कादायक कारण आलं समोर

ड्रायव्हरच्या मस्तीमुळेच नवले ब्रिजवर भीषण अपघात, चौकशीनंतर धक्कादायक कारण आलं समोर

Subscribe

पुण्यातील नवले ब्रिजवर काल (रविवार) भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका कंटेनरने २४ वाहनांना चिरडले. त्यानंतर चालक फरार झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगितलं जात होतं. परंतु पोलिसांच्या चौकशीनंतर एक वेगळंच आणि धक्कादायक कारण समोर आलं आहे.

उतारावर असताना गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे १३ जण जखमी झाले आहेत तर २४ वाहनांचं नुकसान झालं आहे.

- Advertisement -

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा नवले पुलाजवळ अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाल्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी पाहणी केली. यामध्ये कंटेनरचालक मनीलाल यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे. यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. तसेच त्याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात, कंटेनरची अनेक वाहनांना धडक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -