घरताज्या घडामोडीजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची अशी आहे लाईफस्टाईल

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची अशी आहे लाईफस्टाईल

Subscribe

एलन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आपल्या नवनवीन आयड्यांसाठी एलन मस्क ओळखले जातात. एवढं सगळं करण्यासाठी त्यांना प्रोपर प्लॅनिंगची गरज असते. कोणत्याही यशस्वी माणसासाठी डेली रुटीन खूप महत्त्वाचे असते. आज आपण एलन मस्क यांची लाईफस्टाईल कशी असते हे आपण पाहणार आहोत.

एलन मस्क आपल्या काम प्रती खूप सीरियस असतात. ते आपल्या कामासाठी कधी-कधी जेवतही नाहीत. तर काही वेळेला रात्री प्रोडक्शन फ्लोअरवर झोपतात. एलन मस्क सकाळी ७ वाजता उठतात. त्यांनी याबाबत सांगितले की, दररोज सहा ते सात तास ते झोपतात. जर कमी झोपले तर त्यांचा कामावर परिणाम होतो. झोपून उठल्यानंतर अंघोळ करून सकाळी कॉफी पितात. त्यांना जास्तीत जास्त काम लवकर करायचे असल्यामुळे कधी-कधी ते नाष्टा करत नाहीत. ज्या दिवशी ते नाष्टा करतात त्या दिवशी त्यांच्या नाष्टामध्ये ऑमलेट खातात.

- Advertisement -

Reddit AMAमध्ये एलन मस्क बोलतात की, ‘शावर घेणे खूप गरजेचे काम आहे. बिना शावर काम करणे त्यांना योग्य वाटत नाही. उठल्यानंतर शावर घेणे त्यांना दररोज येणाऱ्या चॅलेंजसाठी तयार करतात. त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत सोडतात आणि मग स्वतः कामावर जातात.’

आठवड्यात ८० ते १०० तास एलन मस्क काम करतात असा त्यांनी दावा केला आहे. यामध्ये जास्त करून स्किलसेट डिझाईन आणि इंजिनिअरिंग फोकस असतो. स्पेस एक्समध्ये ९० टक्के वेळ ते डिझाईनचे काम करतात, तर टेस्लामध्ये ६० टक्के वेळेत काम करतात.

- Advertisement -

एलन मस्क मल्टी टास्कर आहेत. ते जास्त करून फोन आणि ईमेल याकडे पाहत नाहीत. जास्त व्यस्त असल्यामुळे ते आपला न्यूट्रिशनवर जास्त लक्ष देऊ शकत नाहीत, असे त्याचे म्हणणे आहे. जर जेवले तर ते दुपारच्या मिटिंगनंतर जेवतात. वेळेला ते जास्त महत्त्व देतात. त्यामुळे ते महत्त्वाच्या नसलेल्या मिटिंगला उपस्थितीत राहत नाहीत. २०१८ साली न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, एलन मस्क आठवड्यात १२० तास काम करत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान जेव्हा त्यांना मुलं झालं तेव्हापासून त्यांनी त्याच्यासोबत जास्त वेळ घालवण्यास सुरुवात केली. त्यांना रात्रीचे जेवण करायला खूप आवडते. तसेच त्यांना डाएट कोक खूप आवडते. एलन मस्क कामातून १० वाजता घरी परतात. त्यानंतर काही वेळ वाचन करतात आणि एनिमिटेड चित्रपट पाहतात. ते जवळपास रात्री १ वाजता झोपतात.


हेही वाचा – RBI Governer Shaktikant Das : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -