घरताज्या घडामोडीरायगडातील होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळणार

रायगडातील होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळणार

Subscribe

तीन दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सण,मोर्चा,आंदोलन असलं की, होमगार्ड आपली जबाबदारी पार पाडत असतात. कोरोना, नैसर्गिक आपत्ती काळातही होमगार्ड यांनी अहोरात्र पोलिसांना मदत केली. होमगार्ड हा नैसर्गिक आपत्ती काळातही मदतीला धावून येऊन आपली सेवा चोख बजवावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे धडे गिरवू लागला आहे. अलिबाग जिल्हा होमगार्ड कार्यालयात तीन दिवसाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ५० होमगार्ड यांना दिले जाणार आहे. यामध्ये होमगार्ड याना लेक्चर, प्रात्यक्षिके शिकवली जाणार आहेत. होमगार्ड प्रमुख ब्रिजेश सिग याच्या संकल्पनेतून जिल्हा होमगार्ड, नागरी दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याच्या संयुक्तपणे हे प्रशिक्षण तीन दिवस सुरू राहणार आहे.रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तींने थैमान घातले. जिल्हा प्रशासन सह पोलीस, होमगार्ड दल या नैसर्गिक आपत्तीत चोख भूमिका बजावत आहेत.

कोरोना काळात मोठे सहकार्य… 

होमगार्ड हे पोलिसांच्या मदतीसाठी बनविलेले दल आहे. मात्र या दलात येणार्‍या तरुणांची संख्या ही कमी आहे. कारण मिळणारे काम हे कमी दिवसाचे आहे. कोरोना काळात मात्र होमगार्ड याचा मोठा सहभाग पोलीस विभागाला मिळाला. त्यामुळे होमगार्ड मध्ये अधिक जणांना सामावून घेण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन सोहळ्यावेळी केली. अप्पर पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी केलेल्या मागणीनुसार होमगार्ड कार्यालय हे नव्याने बांधून त्याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा हॉल सह अद्यावत इमारत बांधण्याची ग्वाहीही कल्याणकर यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

आपत्ती काळात काय करणे गरजेचे आहे, नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिक प्रशिक्षण होमगार्ड यांना दिले जाणार आहे. यासाठी मुंबई येथील प्रशिक्षक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यामार्फत प्रशिक्षण तीन दिवस दिले जाणार आहे. या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सागर पाठक हे उपस्थित होते.


हे ही वाचा – Facebook New Name: Facebook च्या नावात बदल, बदलामागे ‘हे’ कारण?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -